शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
3
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
4
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
5
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
6
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
7
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
8
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
9
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
10
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
11
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
12
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
13
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
14
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
15
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
16
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
17
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
18
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
19
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
20
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
Daily Top 2Weekly Top 5

Indian Railways: भारतातील एकमेव ट्रेन, तिकीट काढण्याची नाही गरज, 73 वर्षांपासून प्रवाशांना देतेय मोफत सेवा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 22, 2022 15:10 IST

Indian Railways: देशात दररोज लाखो लोक रेल्वेने प्रवास करतात, यासाठी प्रवाशांकडून तिकीटही आकारले जाते. पण, भारतात अशी एक ट्रेन आहे ज्यामध्ये प्रवास करण्यासाठी तुम्हाला भाडे द्यावे लागत नाही.

Indian Railway: देशात दररोज लाखो लोक रेल्वेने प्रवास करतात. पण तुम्हाला माहिती आहे का की, भारतात अशी एक ट्रेन आहे ज्यामध्ये प्रवास करण्यासाठी तुम्हाला भाडे द्यावे लागत नाही. ही विशेष ट्रेन हिमाचल प्रदेश आणि पंजाबच्या सीमेवर धावते. तुम्हाला भाक्रा नागल डॅम पाहायला जायचे असेल तर तुम्ही या ट्रेनमधून मोफत प्रवासाचा आनंदही घेऊ शकता.

ट्रेनचे भाडे आकारले जात नाहीवास्तविक ही ट्रेन नांगल ते भाक्रा डॅम दरम्यान धावते. गेल्या 73 वर्षांपासून या ट्रेनमधून एकूण 25 गावांतील लोक मोफत प्रवास करत आहेत. भाक्रा धरणाची माहिती लोकांना देण्यासाठी ही विशेष ट्रेन चालवली जाते. हे धरण बनवताना कोणत्या अडचणी आल्या हे लोकांना सांगणे, हा त्याचा मुख्य उद्देश आहे. ही ट्रेन भाक्रा बियास व्यवस्थापन मंडळाद्वारे चालवली जाते. 

73 वर्षांपासून मोफत प्रवास ही ट्रेन 1949 मध्ये धावली होती आणि गेली 73 वर्षे लोक यामधून मोफत प्रवास करत आहेत. या ट्रेनमधून दररोज 25 गावातील 300 लोक प्रवास करतात. या ट्रेनचा सर्वाधिक फायदा विद्यार्थ्यांना होतो. नांगल ते भाक्रा धरणापर्यंत ही ट्रेन धावते आणि दिवसातून दोनदा प्रवास करते. या ट्रेनमध्ये टीटीई नसतो. डिझेल इंजिनवर चालणारी ही ट्रेन एका दिवसात 50 लिटर डिझेल वापरते. या गाडीचे इंजिन सुरू झाले की, भाक्रा येथून परत आल्यानंतरच ती थांबते.

ही ट्रेन किती वाजता सुटते?ही हास ट्रेन नांगलहून सकाळी 7:05 वाजता निघते आणि भाक्राहून सकाळी 8:20 वाजता नांगलला परत येते. यानंतर पुन्हा एकदा दुपारी 3.05 वाजता ती नांगल येथून निघते आणि सायंकाळी 4.20 वाजता भाक्रा धरणाकडे परत येते.    

टॅग्स :Indian Railwayभारतीय रेल्वेHimachal Pradeshहिमाचल प्रदेशPunjabपंजाब