शहरं
Join us  
Trending Stories
1
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
2
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
3
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
4
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
5
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
6
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
7
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
8
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
9
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
10
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
11
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
12
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
13
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
14
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
15
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
16
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
17
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
18
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
19
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
20
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

अविवाहित तरूणींच्या रक्ताने आंघोळ करत होती ही महिला, ६०० पेक्षा अधिक मुलींची केली होती हत्या!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 8, 2019 13:27 IST

तुम्ही अनेक सिरिअल किलर्सबाबत ऐकलं असेल, ज्यांनी विश्वास बसणार नाही अशा पद्धतीने हत्या केल्या असतील.

(Image Credit : Medium)

तुम्ही अनेक सिरिअल किलर्सबाबत ऐकलं असेल, ज्यांनी विश्वास बसणार नाही अशा पद्धतीने हत्या केल्या असतील. पण आज आम्ही तुम्हाला ज्या महिलेबाबत सांगणार आहोत, तिची कहाणी वाचून तुमच्या अंगावर शहारा येईल. ही महिला अविवाहित तरूणींची हत्या करून त्यांच्या रक्ताने आंघोळ करत होती. त्याचं कारणही विचित्रच होतं. 

या महिलेचं नाव होतं एलिजाबेथ बाथरी. या महिलेला इतिहासातील सर्वात कुख्यात आणि निर्दशी महिला सिरिअल किलर म्हणून ओळखलं जातं. एलिजाबेथ बाथरीने १५८५ ते १६१० दरम्यान ६०० पेक्षा अधिक तरूणींची हत्या करून त्यांच्या रक्ताने आंघोळ केली होती.एलिझाबेथने या तरूणींची हत्या तिच्या महालातच केली होती. एलिझाबेथ ही हंगरी साम्राज्यातील उच्चभ्रू बाथरी परिवारातील होती. तिचं लग्न फेरेंक नॅडेस्डी नावाच्या व्यक्तीसोबत झालं होतं. ही व्यक्ती तुर्की विरोधात युद्धातील हंगरीचा नॅशनल हिरो होता.

(Image Credit : The Vintage News)

एलिझाबेथ बाथरीचा पती जिवंत होता, तेव्हाही ती तरूणींना तिची शिकार बनवत होती. पण १६०४ मध्ये त्याच्या मृत्युनंतर तिने जणू हत्या करण्याचा सपाटाच लावला होता. एलिझाबेथ स्लोवानियाच्या चास्चिस येथील तिच्या महालात राहत होती. तिथेच ती या तरूणींची हत्या करत होती.

असे सांगितले जाते की, एलिझाबेथ बाथरीला तिच्या या भयानक गुन्ह्यात तिचे तीन नोकर मदत करत होते. ती एका उच्चभ्रू परिवारातील होतील म्हणून ती आजूबाजूच्या गावातील गरीब मुलींना चांगले पैसे देऊन कामाचं आमिष दाखवून महालात बोलवत होती. पण या तरूणी महालात येताच तिच्या शिकार ठरत होत्या. 

असे सांगितले जाते की, एलिझाबेथ आधी तरुणींना शारीरिक त्रास देत होती. त्यांना मारत होती, इतकेच काय तर त्यांचे हात कापत होती किंवा जाळत होती. अनेकदा ती काही तरूणींच्या शरीरावरील मांस दातांनी कापून काढत होती आणि शेवटी तिची हत्या करून तिचं रक्त एका टबमध्ये भरून त्यात आंघोळ करत होती. याचा उल्लेख अनेक पुस्तकांमध्ये करण्यात आला आहे.

असेही म्हटले जाते की, जेव्हा आजूबाजूच्या गावातील गरीब मुलींची सख्या कमी झाली तेव्हा तिने श्रीमंत घरातील मुलींना आपली शिकार बनवणे सुरू केलं होतं. हे बाब जेव्हा हंगरीच्या राजाला कळाली तेव्हा त्याने याची चौकशी करण्याचा आदेश दिला. तेव्हाच याचा खुलासा झाला. चौकशी करणाऱ्या पथकाने एलिझाबेथच्या महालातून मुलींचे सांगाडे आणि सोन्या-चांगीचे दागिणे मिळवले होते.

१६१० मध्ये एलिझाबेथ बाथरीला तिच्या या भयंकर कृत्यासाठी अटक करण्यात आली आणि तिला तिच्यात महालातील एका खोलीत कैद करण्यात आलं. तिथे चार वर्षांनी २१ ऑगस्ट १६१४ मध्ये तिचा मृत्यू झाला. असेही म्हणतात की, एलिझाबेथ फार सुंदर होती आणि तिला तिचं हे सौंदर्य कायम ठेवायचं होतं. या कारणानेच तिने ६०० तरूणींची हत्या केली होती. तारूण्य टिकवून ठेवण्यासाठी ती रक्ताने आंघोळ करत होती. 

टॅग्स :Murderखूनhistoryइतिहास