शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

अरे बापरे - न्यायाधीशच बोगस निघाले, ते ही तब्बल 21 वर्षांनी निवृत्त झालेले!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 25, 2017 14:37 IST

बोगस डॉक्टर, बोगस वकिल, बोगस शिक्षक असे अनेक प्रकार घडत असतात आणि त्यांचा फैसला न्यायालयात केला जातो, परंतु न्यायाधीशच बोगस निघाले तर काय करायचं? असा सवाल एका प्रकरणामुळे समोर आला आहे

ठळक मुद्देमदुराईतील उलगानेरी येथील पी नटराजन यांना बार काउन्सिलनं नोटीस पाठवली आहे21 वर्षे न्यायाधीश व नंतर 4 वर्षे वकिल असं न्यायदानाशी संबंधित काम करत असताना तुमच्याकडे पदवीच नाही, तुमची सनद रद्द का करू नये अशी विचारणा बार काउन्सिलनं केली25 वर्षे न्यायदानाच्या सेवेत असलेल्या व्यक्तिशी असं वागणं बरं नाही असं उत्तर नटराजन यांनी दिलं

चेन्नई - बोगस डॉक्टर, बोगस वकिल, बोगस शिक्षक असे अनेक प्रकार घडत असतात आणि त्यांचा फैसला न्यायालयात केला जातो, परंतु न्यायाधीशच बोगस निघाले तर काय करायचं? असा सवाल एका प्रकरणामुळे समोर आला आहे. तामिळनाडूमध्ये 21 वर्षे न्यायाधीश म्हणून काम केलेल्या व आता निवृत्त होऊन पेन्शन घेणाऱ्या व्यक्तिकडे कायद्याची अधिकृत पदवीच नाही, असे समोर आल्याने बार काउन्सिलही हादरून गेले आहे.

मदुराईतील उलगानेरी येथील पी नटराजन यांना बार काउन्सिलनं नोटीस पाठवली आहे. 21 वर्षे न्यायाधीश व नंतर 4 वर्षे वकिल असं न्यायदानाशी संबंधित काम करत असताना तुमच्याकडे पदवीच नाही, त्यामुळे तुमची सनद रद्द का करू नये अशी विचारणा बार काउन्सिलनं केली आहे. तर 25 वर्षे न्यायदानाच्या सेवेत असलेल्या व्यक्तिशी असं वागणं बरं नाही असं उत्तर नटराजन यांनी दिलं आहे.

हे प्रकरण असं आहे की, नटराजन यांनी मैसून विद्यापीठाशी संलग्न शारदा लॉ कॉलेजमधून दूरशिक्षण पद्धतीनं कायद्याची डिग्री घेतली आहे. विशेष म्हणजे, ही पदवी केवळ शैक्षणिक हौस म्हणून उपयोगाची आहे, वकिली करण्यासाठी किंवा न्यायाधीश होण्यासाठी तिचा उपयोग शून्य आहे. आपल्याला असं सांगण्यात आलं नव्हतं असा नटराजन यांचा दावा आहे.

विशेष म्हणजे, ती कथित डिग्री घेतल्यानंतर नटराजन यांची ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट म्हणून निवड करण्यात आली. त्यावेळी नटराजन यांची डिग्री वैध आहे अथवा नाही याची शहानिशाही केली गेली नाही. नटराजन यांनी तब्बल 21 वर्षे न्यायाधीशाचं काम मजेत केलं आणि 2003 मध्ये निवृत्तदेखील झाले.

हे पुरेसं नाही म्हणून की काय, निवृत्त झाल्यावर महिन्याभरातच त्यांनी तामिळनाडू व पुद्दुचेरी बार काउन्सिलकडे वकिल म्हणून नोंदणीसाठी अर्ज केला, आणि त्यांची नोंदणीही करण्यात आली. काही कारणानं सर्वोच्च न्यायालयाने वकिलांच्या प्रमाणपत्रांची पडताळणी करण्याचा जेव्हा आदेश दिला, तेव्हा बार काउन्सिलचे अधिकारी नटराजन यांच्या प्रमाणपत्रांना बघून हादरले. त्यांची प्रमाणपत्र वकिली पेशासाठी कुचकामी असल्याचं त्यांच्या लक्षात आलं आणि त्यांनी नटराजन यांना कारणे दाखवा नोटीस बजावली. त्यांचा इतिहास बघता, कायद्याची पदवीदेखील नसलेल्या या व्यक्तिनं न्यायाधीश म्हणून 21 वर्षे काम केल्याचं समोर आलं आणि बार काउन्सिलच्या अधिकाऱ्यांचं धाबं दणाणलं.