शहरं
Join us  
Trending Stories
1
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय दलित तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
2
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
3
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
4
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
5
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
6
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
7
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
8
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
9
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
10
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
11
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
12
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
13
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
14
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
15
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
16
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
17
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
18
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
19
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
20
बाजारात जोरदार उसळी! गुंतवणूकदारांनी कमावले ३.५ लाख कोटी रुपये; 'ही' ६ कारणे ठरली गेमचेंजर
Daily Top 2Weekly Top 5

तो, ती, समुद्र, प्रपोझ... आणि त्यांचा कुत्रा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 11, 2021 06:54 IST

काहीही असो, तू माझा / माझी होशील का, हा प्रश्न विचारणं आणि अपेक्षित उत्तर मिळणं हे सगळंच एकूण हृदयाची धडधड वाढवणारंच प्रकरण

जगातल्या कुठल्याही पुरुषाला विचारा, त्याच्या आयुष्यातल्या आत्यंतिक तणावाचे प्रसंग कुठले?, मैत्रिणीला गर्लफ्रेंड होण्यासाठी किंवा गर्लफ्रेंडला लग्नासाठी प्रपोज करणं हे त्यात कायम पहिल्या पाचात असणार. मैत्रीण कितीही जवळची असू दे, ती आपल्याला कितीही आवडत असू दे, तिलाही आपल्याबद्दल ‘तसंच’ वाटतं असं आपल्याला कितीही मित्रांनी सांगितलेलं असू दे, तिच्याही मनात ‘तेच’ आहे ही बातमी तिच्या मैत्रिणींकडून आपल्याला मिळालेली असू दे… तरीही… ॲक्च्युअल प्रपोज करण्याचं टेन्शन काही कमी होत नाही. आणि म्हणूनच, प्रपोज करण्याच्या आधी कितीही सेटिंग लावलेलं असू दे, प्रपोज करतांना काहीतरी स्पेशल करण्याचा बहुतेक सगळ्यांचा प्रयत्न असतो. पण, प्रपोज करणाऱ्या मुलींचं प्रमाण एकूणच नगण्य असल्याने बहुतेक वेळा हा भार मुलांच्या डोक्यावर असतो. त्यातून हिंदी सिनेमांनी हे प्रकरण अधिकच किचकट करुन टाकलेलं आहे. म्हणजे सामान्यांसाठी आयडिया देणं तर राहिलं दूरच; प्रपोज कसं करावं याची भीतीच मोठी !

मग कोणी हॉटेलमध्ये प्रपोज करतं, कोणी रोमँटिक माहोल तयार करून प्रपोज करतं, कोणी कॉलेजच्या पार्किंगमध्ये एका गुलाबाच्या फुलावर प्रपोज मारतं, तो नेमका क्षण पकडता यावा, निर्माण करता यावा म्हणून एखादी ट्रीप वगैरे ठरवतं .. काहीही असो, तू माझा / माझी होशील का, हा प्रश्न विचारणं आणि अपेक्षित उत्तर मिळणं हे सगळंच एकूण हृदयाची धडधड वाढवणारंच प्रकरण ! असाच एक जण त्याच्या गर्लफ्रेंडला आणि सोनी नावाच्या गोल्डन रिट्रिव्हर कुत्र्याला घेऊन एक दिवस बीचवर फिरायला गेला होता. त्याने अर्थातच त्याच्या गर्लफ्रेंडला सांगितलं असणार की, आपण नेहमीसारखे फक्त आऊटिंगला जातोय. तिथे गेल्यावर त्याने त्याच्या फोनचा व्हिडिओ रेकॉर्डर चालू केला आणि मैत्रिणीला मात्र सांगितलं की, आपल्याला एक सेल्फी घ्यायचा आहे. तिने सेल्फीसाठी पोझ घ्यायला सुरुवात केली आणि तेवढ्यात तो एका गुढग्यावर खाली बसला आणि त्याने तिला प्रपोज केलं.

कोणी म्हणेल की, यात एवढं भारी काय आहे?, ही आयडिया तर आत्तापर्यंत अनेक जणांनी वापरली असणार. पण, जगभरात सर्वत्र चर्चेचा विषय ठरलेल्या या इंस्टाग्राम स्टोरीमध्ये सगळ्यात भारी काय असेल तर, तो सोनी नावाचा कुत्रा ! त्याच्या मालकाने आपल्या गर्लफ्रेंडला प्रपोज केल्याबरोबर त्याने आत्यंतिक आनंदाने सुसाट पळायला आणि उड्या मारायला सुरुवात केली. अर्थातच हे त्याने समजून केलेलं असण्याची शक्यता अगदीच नगण्य आहे. पण, व्हिडिओ बघताना मात्र असं वाटतं, की जणू काही सोनी त्या प्रपोज करण्याच्या घटनेने सॉलिड खूश झाला असावा. त्या माणसाच्या गर्लफ्रेंडने त्याला होकार दिला ही, त्या व्हिडिओतली अजून एक जमेची बाजू झाली. पण, लोकांना मुख्यतः तो व्हिडिओ आवडला आहे तो, त्यातील सोनीच्या प्रतिक्रियेमुळे. कदाचित असं असावं, की ज्या अर्थी कुत्रा एवढा खूश झाला आहे त्याअर्थी हे नातं छान असेल असं तो व्हिडिओ बघताना लोकांना वाटलं असेल. 

कारण माणसं एकमेकांशी खोटं वागतात आणि एकमेकांच्या खोट्या वागण्याला फसतात. पण, कुत्री कधीच खोटं वागत नाहीत आणि सामान्यतः माणसांच्या खोटं वागण्याने फसतही नाहीत. सोनीला जर, का त्याच्या मालकाची गर्लफ्रेंड पटली नसती, त्याच्या मते जर का ती खोटं वागणारी बाई असती, तर त्याने तिला मुळात स्वीकारलंच नसतं. हे कुत्रं आवडणाऱ्या आणि न आवडणाऱ्या देखील माणसांना माहिती असतं. आणि म्हणूनच कुत्र्याने आनंद व्यक्त केला त्याअर्थी ह्या नात्यात पुढे सगळं छान होईल असं लोकांना सुप्त मनात वाटलं असावं. एकूणच कुत्री, मांजरं आणि इतर पाळीव प्राण्यांना असलेल्या उपजत शहाणपणाच्या कथा सगळ्यांनीच कायम ऐकलेल्या असतात. काही जणांनी त्या प्रत्यक्ष अनुभवलेल्या असतात. बाल्कनीत घरातला लहान मुलगा चालत आला, तर त्याला कठड्याच्या जवळ येऊ न देणारं मांजर, गावाला गेलेल्या मालकाची वाट बघत वैरणीतली एक काडीही न खाणारी गाय, स्वतःच्या जीवावर उदार होऊन घरातल्या माणसांचं रक्षण करणारी कुत्री या गोष्टी आपण अनुभवलेल्या असतात.  प्राण्यांच्या भावविश्वातली ही निरागसता अनेकदा थक्क करणारी असते.त्यामुळेच सगळ्या सोशल मीडियावरती पाळीव प्राण्यांचे आणि लहान बाळांचे व्हिडिओज सगळ्यात जास्त भाव खाऊन जातात. कारण सोशल मीडियावरच्या सततच्या वाईट बातम्या, आपल्याच जवळच्या माणसांनी एकमेकांवर केलेल्या राजकीय विचारसरणीच्या कुरघोड्या आणि एकूणच सतत आजूबाजूला असलेलं नकारात्मक आणि द्वेषाने भरलेलं वातावरण यात सगळ्यात नितळ म्हणावं असं प्रेम तिथेच तर दिसतं !

‘गुडन्यूज डॉग’वरची प्रेमकहाणी आता या सोनी नावाच्या कुत्र्याच्या मालकाचं आणि त्याच्या गर्लफ्रेंडचं नाव काय, याचा काहीही तपशील या व्हायरल व्हिडिओत नाही.. पण, तीच तर त्याची गंमत आहे. गुडन्यूजडॉग नावाच्या इंस्टाग्राम हॅन्डल वरची ही ‘झुमी’ जगभरातल्या अनेकांच्या आनंदाचं कारण ठरली आहे, हे मात्र नक्की !