शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

Video: प्रोफेसरनं मुलींना प्रेमाचं गणित शिकवलं; कॉलेजनं घरी बसवलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2019 11:09 IST

लव्ह फॉर्म्युला शिकवणाऱ्या प्राध्यापकांचं कॉलेजकडून निलंबन

कर्नाल: मुलींच्या महाविद्यालयात लव्ह फॉर्म्युला शिकवणं एका प्राध्यापकाला चांगलंच महागात पडलं. संबंधित प्राध्यापकाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर महाविद्यालयानं प्रकरणाची गंभीर दखल घेतली. प्राध्यापकानं घडलेल्या प्रकाराबद्दल विद्यार्थ्यांची माफी मागितली. मात्र त्याच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली. हरयाणाच्या कर्नालमधील मुलींच्या महाविद्यालयातील गणिताचे प्राध्यापक चरण सिंह यांनी वर्गात 'फॉर्म्युला ऑफ लव्ह' शिकवला. प्राध्यापकांनी हा फॉर्म्युला फळ्यावर लिहून तो विद्यार्थिनींना अगदी व्यवस्थित समजावून सांगितला. त्यावेळी एका विद्यार्थिनीनं हा संपूर्ण प्रकार चित्रीत केला. तिनं हा व्हिडीओ प्राचार्यांना दाखवला. यानंतर प्राध्यापकांनी विद्यार्थिनींची माफी मागितली. मात्र महाविद्यालय प्रशासनानं त्यांना निलंबित केलं. 'जवळीक - आकर्षण = मैत्री', 'जवळीक + आकर्षण = रोमँटिक प्रेम', 'आकर्षण - जवळीक = क्रश' अशी सूत्रं चरण सिंह यांनी विद्यार्थिनींना शिकवली. या सूत्रांमधील प्रत्येक शब्द त्यांनी मुलींना हिंदीत समजावून सांगितला. वय वाढल्यानंतर पती-पत्नी यांना एकमेकांविषयी वाटणारं आकर्षण कमी होतं आणि ते परस्परांचे मित्र होतात, असा दावा सिंह यांनी केला. सिंह प्रेमाची सूत्रं समजावून सांगत असताना वर्गात एकच हशा पिकला होता. 

 

टॅग्स :Professorप्राध्यापकcollegeमहाविद्यालय