शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
3
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
4
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
5
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
6
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
7
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
8
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
9
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
10
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
11
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
12
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
13
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
14
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
15
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
16
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
17
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
18
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
19
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
20
Vaibhav Suryavanshi Fastest Fifty :..अन् वैभव सूर्यंवशीनं रचला नवा इतिहास

कोरोना काळात गेली नोकरी, नवरा बनला जिगोलो; भांडाफोड होताच पत्नीने मागितला घटस्फोट

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 13, 2021 14:28 IST

गेल्या वर्षी कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर लावण्यात आला होता लॉकडाऊन, या काळात अनेकांच्या नोकऱ्यांवर आली होती गदा.

ठळक मुद्देगेल्या वर्षी कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर लावण्यात आला होता लॉकडाऊन या काळात अनेकांच्या नोकऱ्यांवर आली होती गदा.

गेल्या वर्षी कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर देशात लॉकडाऊन लावण्यात आला होता. या काळात अर्थचक्र पूर्णपणे थांबलं होतं. याचाच परिणाम म्हणून अनेकांना आपली नोकरीही गमावावी लागली होती. लॉकडाऊनचा फटका बसललेल्या बंगळुरूमधील एका व्यक्तीला यानंतर नाईलाजानं जिगोलो व्हावं लागलं. सुरूवातीच्या काळात सर्वकाही ठीक होतं. परंतु कालांतरानं त्याच्या पत्नीला याबद्दल समजलं. त्यानंतर त्यांच्या संसारात मोठा भूकंप आला.२४ वर्षीय महिलेनं याप्रकरणानंतर घटस्फोटाची मागणी केली आहे. नोकरी गेल्यानंतर आपला पती जिगोलो बनला आणि त्यानं ही बाब लपवून ठेवल्याचं त्यानं महिलेनं सांगितलं. बंगळुरु पोलीस आणि महिला हेल्पलाईननं दोघांमधील मतभेद मिटवण्यासाठी अनेकदा काऊंन्सिलिंग केलं. परंतु त्यानंतरही आता हे दांपत्य एकत्र राहू इच्छित नसल्याचं समोर आलं आहे. दोघांनीही आपल्या संमत्तीनं वेगळं होण्याचा निर्णय घेतला आहे. टाईम्स ऑफ इंडियामध्ये प्रसिद्ध करण्यात आलेल्या वृत्तानुसार दोघांची भेट २०१७ मध्ये कॉल सेंटरच्या कॅन्टिनमध्ये झाली होती. त्यानंतर २०१९ मध्ये दोघांनी लग्नाचा निर्णय घेतला. दोघांनी बंगळुरूमधील एका ठिकाणी भाडेतत्त्वावर घरही घेतलं. परंतु कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशात लॉकडाऊन लावण्यात आला. या दरम्यान, तिच्या पतीची नोकरी गेली. त्यानंतर त्यानं नोकरीचा शोध सुरू केला. दरम्यान, काही महिन्यांनंतर महिलेला आपला पती काहीतरी लपवत असल्याचं जाणवलं. तासनतास तो लॅपटॉप आणि मोबाईलमध्ये व्यस्त होता. इतकंच नाही तर अनेकदा तो वेळी अवेळी घराबाहेरही जात होता. तो कुठे जातोय याची माहितीही आपल्याला देत नव्हता असं महिलेनं सांगितलं. त्याच्यावर संशय आल्यानंतर महिलेनं नोव्हेंबर महिन्यात आपल्या भावाच्या मदतीनं त्याचा लॅपटॉप उघडला. त्यात तिला एक सिक्रेट फोल्डर सापडला. या फोल्डरमध्ये महिलेला आपल्या पतीचे काही आक्षेपार्ह फोटो दिसून आले. तसंच आपला पती जिगोलो असून तासासाठी ३ ते ५ हजार रूपये आकारतो याची माहितीही तिला मिळाली. दरम्यान, महिलेच्या पतीनं या गोष्टी कबूल केल्याची माहिती काऊन्सिलरकडून देण्यात आली. आपल्या एका मित्रानं हे काम सूचवलं होतं असं त्या व्यक्तीनं सांगितल्याचंही काऊन्सिलर यांनी सांगितलं.

टॅग्स :BengaluruबेंगळूरCourtन्यायालयDivorceघटस्फोटcorona virusकोरोना वायरस बातम्याjobनोकरी