शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानवर हसावं की रडावं.... आता म्हणे मोहसीन नक्वीला गोल्ड मेडल देणार, सन्मान करणार !
2
सानिया मिर्झाशी घटस्फोट, आता शोएब मलिकचे सना जावेदशीही लग्न तुटणार? VIDEO मुळे उडाली खळबळ
3
२ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना कफ सिरप देऊ नका, केंद्राचा सल्ला; राजस्थान, मध्य प्रदेशात ११ बालकांचा मृत्यू
4
वेळागर समुद्रात आठजण बुडाले; तिघांचे मृतदेह हाती, एकीचा जीव वाचला, किनाऱ्यावर आक्रोश
5
राज्यात अतिवृष्टी, पूरस्थिती; अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेची ४-६ ऑक्टोबरला अंतिम विशेष फेरी
6
शेतकऱ्यांसाठी काँग्रेस रस्त्यावर; नुकसानग्रस्तांना तत्काळ मदत मिळण्यासाठी राज्यभर आंदोलन
7
'फिट' है तो 'हिट' है... बॉलिवूड अभिनेत्रीचा कमालीचा फिटनेस, या वयातही चाहत्यांना करते घायाळ
8
“बावळट-मूर्ख, मनोज जरांगेंसारखा नेता मिळणे मराठ्यांचे दुर्दैव”; लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल
9
"तुम्ही आम्हाला शिकवू नका..."; भारताने पाकिस्तानला चांगलंच सुनावलं, UN मध्ये काय घडलं?
10
आशाबाई, अंबिका अन् सुनीता... सोलापुरात दोन दिवसांत तीन महिलांची हत्या, कारण एकच
11
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि.बा. पाटलांचे नाव; PM मोदींची राज्य सरकारच्या निर्णयाला मंजुरी
12
IND vs AUS : तिलक वर्माचं शतक थोडक्यात हुकलं; ऑस्ट्रेलियाविरुद्ध अभिषेकवर 'गोल्डन डक'ची नामुष्की
13
RSS च्या पथसंचलनात ढोल वाजवणाऱ्या स्वयंसेवकाचा हृदयविकाराने मृत्यू; व्हिडिओ व्हायरल
14
वैभव खेडेकरांचा तीनदा भाजपा प्रवेश रखडला, आता शिवसेनेत जाणार? शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
15
काँग्रेसनेही निवडणुकांसाठी कंबर कसली! नागपुरात ४, ५ ऑक्टोबरला विचारमंथन कार्यशाळा
16
IND vs WI: ‘ध्रुव तारा’ चमकला! पहिल्या सेंच्युरीनंतर बॅटची बंदूक करून 'बाप-माणसाला' सेल्युट! (VIDEO)
17
Business: २ मित्रांनी सोडली कॉर्पोरेट नोकरी, दूध विकून झाले कोट्यधीश, तयार केला मोठा ब्रँड!
18
सणासुदीच्या तोंडावर सोन्या-चांदीचे दर घसरले! तुमच्या शहरात आज एका तोळ्याची किंमत किती?
19
POKमध्ये पाकचे अत्याचार, भारताची पहिली प्रतिक्रिया; असीम मुनीर यांचा घेतला खरपूस समाचार
20
'आता संयम ठेवणार नाही; पाकिस्तानला जगाच्या नकाशावरुन मिटवू...', लष्करप्रमुखांचा पाकला थेट इशारा

आकाशपाळण्यात अडकलेल्या चिमु्कल्यांचा मृत्यूशी खेळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 3, 2017 15:43 IST

नॉर्थ कॅरोलिनामध्ये एका ठिकाणी आकाशपाळण्याच्या चाकात दोन लहान मुलं अडकली होती. त्यांना वाचवण्यासाठी एका व्य़क्तीने शर्थीने प्रयत्न केले मात्र ....

ठळक मुद्देकधी कधी आपल्या निष्काळजीपणामुळे आणि अतिउत्साहामुळे आपला मोह आपल्याच जिव्हारी लागू शकतो. आपला जीव वाचवण्यासाठी त्यांच्याकडे कोणताच मार्ग उरला नव्हता. उडी मारुन जीव वाचवण्याचा प्रश्नच येत नव्हता.हा प्रसंग तेथील एका प्रत्यक्षदर्शीने व्हिडीओत कैद  केला. तो व्हिडिओ एका युट्यूब चॅनलवर अपलोड होताच व्हायरल झाला.

जत्रेत गेल्यावर आकाशपाळण्यात बसण्याचा कोणालाच मोह आवरत नाही. मात्र कधी कधी आपल्या निष्काळजीपणामुळे आणि अतिउत्साहामुळे हा मोह आपल्याच जिव्हारी लागू शकतो. असाच एक प्रकार घडला नॉर्थ कॅरोलिनामध्ये. तिथे एका ठिकाणी आकाशपाळण्याच्या चाकात दोन लहान मुलं अडकली होती. त्यांना वाचवण्यासाठी एका व्य़क्तीने शर्थीने प्रयत्न केले. मात्र त्यांना वाचवताना त्याचाच तोल जाऊन तो खाली आदळला.

नॉर्थ कॅरेलिनोच्या एका जत्रेत आकाशपाळण्यात बसलेली दोन लहान मुलं त्यातल्या चाकात अडकली. एवढ्या उंचावर दोन लहान मुलं अडकल्याचे पाहून सगळ्यांच्याच काळजाचा ठोका चुकला. त्या अडकलेल्या मुलांमध्ये एक ५ वर्षांचा आणि दुसरा ७ वर्षांचा मुलगा होता.  त्यांचा जीव वाचवणे फार गरजेचं होतं. त्यासाठी आकाशपाळण्याच्या मालकाने पुढाकार घेतला आणि त्यांना वाचवू लागला. एवढ्या उंचीवर अडकल्याने मुलं फार घाबरली होती. आपला जीव वाचवण्यासाठी त्यांच्याकडे कोणताच मार्ग उरला नव्हता. उडी मारुन जीव वाचवण्याचा प्रश्नच येत नव्हता. ते घाबरलेले दोघं आम्हाला मरायचं नाहीये, आम्हाला वाचवा अशी,आर्त साद घालत होते. खाली उभी असलेली आईही जीवाच्या आकांताने रडत होती. आकाशपाळण्याचा मालक त्या दोन जीवांना वाचवण्याचे प्रयत्न करत असताना खाली कोसळला. आकाशपाळण्यांचा डब्यांचा त्याला जबर माल लागला. त्यामुळे पुन्हा उठून त्या बाळांना वाचवण्याचा त्राणच त्याचात उरला नाही. त्यामुळे त्या बालकांना आता वाचवणार कोण असा प्रश्न सर्वांना पडला होता. मग आईने स्वत: प्रयत्न करायला सुरुवात केली. त्या माऊलीने हार पत्कारली नाही. ती स्वत: त्या आकाशपाळण्यावर चढली आणि आपल्या मुलांना वाचवू लागली.

हा प्रसंग तेथील एका प्रत्यक्षदर्शीने व्हिडीओत कैद  केला. तो व्हिडिओ एका युट्यूब चॅनलवर अपलोड होताच व्हायरल झाला. सप्टेंबरमध्ये घडलेल्या या प्रकाराच्या व्हिडीओने युट्यूबवर ५० हजारांपेक्षा जास्त व्ह्यूज मिळवले आहेत.