शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताला ५० टक्क्याचा शॉक; ट्रम्प यांनी दुप्पट केले टॅरिफ; काय होणार परिणाम?
2
आजचे राशीभविष्य, ०७ ऑगस्ट २०२५: चिंतामुक्त व्हाल, हाती पैसा राहील; यशाचा शुभ दिवस
3
डोनाल्ड ट्रम्पच्या प्रयत्नांनाही पुतिन बधले नाहीत! चीनसोबत युद्धाची तयारी सुरू; पुढे काय करणार?
4
घरे, झाडे सर्व काही गाडले, हाती काही लागेना; मानवाच्या हव्यासाने आले संकट
5
डोनाल्ड ट्रम्प भारतात राहायला येणार? रहिवासी प्रमाणपत्रासाठी केला अर्ज! प्रशासनाची कोंडी
6
उत्तराखंडमधील ढगफुटीचे थैमान; महाराष्ट्रातील ५१ पर्यटक सुरक्षित
7
सावरकर सदन: वारसास्थळ दर्जाचा लवकरच निर्णय; महापालिकेची हायकोर्टात माहिती; अभिनव भारत काँग्रेसची याचिका
8
रेपो दर जैसे थे; कर्ज हप्ता राहणार स्थिर; ‘ट्रम्प टॅरिफ’च्या पार्श्वभूमीवर रिझर्व्ह बँकेचा निर्णय
9
दिव्याखाली अंधार! हा घ्या, अमेरिकेने रशियाकडून केलेल्या आयातीचा हिशेब
10
महिंद्रा अँड महिंद्रा समूहाचे कर्मचारी होणार मालामाल, मिळणार ५०० कोटींचे शेअर्स
11
शिंदे, ठाकरे दिल्लीत, चर्चा महाराष्ट्रात! एकनाथ शिंदेंची अमित शाह यांच्याशी बंदद्वार चर्चा; पंतप्रधानांना सहकुटुंब भेटले
12
यूपीआय फ्री की फी? शुल्काचे संकेत; काय म्हणाले RBI गवर्नर संजय मल्होत्रा?
13
...तर निवृत्तीनंतरचे आयुष्य येईल धोक्यात, हे करा उपाय
14
"हा अमेरिकेचा दुटप्पीपणाच, भारताने आता..."; शशी थरुर यांनी मोदी सरकारला काय दिला सल्ला?
15
"राष्ट्रहिताच्या रक्षणासाठी आम्ही..."; ५० टक्के टॅरिफनंतर भारताचे डोनाल्ड ट्रम्प यांना उत्तर
16
"अंधभक्तांना विनंती, राजकीय नियुक्तीचे समर्थन करु नका; कारण..."; रोहित पवारांनी काय दिला इशारा?
17
अहिल्यानगर: चौथीत शिकणाऱ्या मुलीवर शिक्षकाकडूनच अत्याचाराचा प्रयत्न, नेत्याने प्रकरण दाबले; पण...
18
'पंतप्रधानांना महादेवाची प्रतिमा भेट दिली, कारण...'; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोदींच्या भेटीनंतर काय बोलले?
19
कोल्हापुरकरांसाठी आनंदाची बातमी! वनताराच्या सीईओंनी केली मोठी घोषणा; महास्वामीही म्हणाले, अंबानींच्या भूमिकेला....
20
बापाचा दारु प्यायल्यामुळे मृत्यू, बारचालकांचा बदला घेण्यासाठी मुलगा बनला चोर; सगळं प्रकरण ऐकून पोलिसही चक्रावले

पतीच्या मृत्यूची बनावट कागदपत्रे : महिलेसह १२ जणांविरुद्ध खटला दाखल

By admin | Updated: May 12, 2014 19:54 IST

फसवणूक केल्याप्रकरणी मूर्तिजापूर न्यायालयाने महिलेसह १२ जणांविरुद्ध खटला दाखल केला आहे.

मूर्तिजापूर : पतीच्या मृत्यूची बनावट कागदपत्रे तयार करू न गोकुल यशवंत गोपनारायण या इसमाची फसवणूक केल्याप्रकरणी मूर्तिजापूर न्यायालयाने महिलेसह १२ जणांविरुद्ध खटला दाखल केला आहे. संगीता रामदास इंगळे (३८) रा. सोनोरी असे मुख्य आरोपी महिलेचे नाव आहे.

या प्रकरणाची माहिती अशी, की अकोल्यातील पंचशील नगरात राहणारे गोकुल गोपनारायण यांच्या पत्नीचे २००७ मध्ये निधन झाले होते. यानंतर गजानन पंढरी इंगळे यांच्या ओळखीच्या माध्यमातून गोकुल यांची ओळख संगीता इंगळे या महिलेसोबत झाली होती. संगीताने आपला पती मरण पावला असल्याची माहिती गोकुल यांना दिल्यानंतर दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. ३ जून २००८ रोजी संगीता ही नांदावयास आली. यानंतर काही दिवसातच तिच्या हालचाली संशयास्पद दिसल्या. ती मानसिक छळ करीत असल्याचे लक्षात आल्यावर गोकुल गोपनारायण यांनी सखोल चौकशी केली. त्यांनी न्यायालयात सादर केलेल्या तक्रारीनुसार या महिलेचे हरिष गोरोबा शिंदे रा. चिंचवड पुणे, गोकुल समरत तेलगोटे रा. आंबोडा वेस, आकोट व साहेबराव खळे रा. मजलापूर दापुरा या लोकांसोबत संबंध होते.

दरम्यान, साहेबराव खळे यांनी संगीतावर पत्नीचा हक्क दाखविला. गोकुल गोपनारायण यांनी या प्रकरणाचा पाठपुरावा करीत हरिष शिंदे यांच्या मृत्यू दाखल्यावर संशय आला. त्यांनी चौकशी करण्यासाठी न्यायालयात अर्ज दाखल केला. या प्रकरणाची २०२ नुसार चौकशी झाली. त्यामध्ये संगीता रामदास इंगळे हिने शाळेचे व मृत्यूचे दाखले खोटे असल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले. तक्रारकर्ता गोकुल गोपनारायण यांनी या सर्व प्रकरणात फसवणूक झाल्याची तक्रार न्यायालयात दाखल करू न पत्नी संगीता इंगळे, रामदास ज्योतीराम इंगळे, शकुंतला रामदास इंगळे, योगेश रामदास इंगळे रा. सर्व सोनोरी, प्रमोद उत्तम गुडदे, बाली प्रमोद गुडदे रा. दस्तुनगर अमरावती, मोहन चंद्रभान वानखडे, नलिनी मोहन वानखडे,रवींद्र देवराव वानखडे, शालिनी रवींद्र आठवले रा. श्रीवास्तव लेआउट मोठी उमरी अकोला, जयश्री रामदास इंगळे, तुकाराम नगर पुणे व गजानन पंढरी इंगळे, प्रतिभा नगर सोनोरी यांना दोषी धरले आहे. या प्रकरणात न्यायाधीश निखिल गोसावी यांनी सर्व आरोपींविरुद्ध भादंविच्या कलम ४२०,४६८,४७१,सह ३४ नुसार आदेशिका जारी केली आहे. या प्रकरणात तक्रारकर्ते गोपनारायण यांच्यावतीने  ्रशांत गोरे, सुरेश खरडे, भास्कर मोडक यांनी काम पाहिले