उदगीर/ जळकोट : उदगीर विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुधाकर भालेराव यांना जिवे मारण्याच्या धमक्या येत असल्याची तक्रार त्यांनी शनिवारी पोलीस अधीक्षकांकडे केली आहे़ भाजपाचे नेते आ़ सुधीर मुनगंटीवार यांच्या उपस्थितीत सोमवारी उदगीर शहरात मोर्चा व मेळावा होणार आहे. या कार्यक्रमांच्या पार्श्वभूमीवर भालेराव यांनी शनिवारी पोलीस अधीक्षक ज्ञानेश्वर चव्हाण यांना पत्र देऊन कुटुंबाच्या जिवाला धोका असल्याचे सांगितले. आमदार म्हणून कार्यक्रमांना हजेरी लावताना काही लोकांकडून राजकीय हेतुने अडथळे निर्माण करणे, जिवे मारण्याच्या धमक्या देणे, असे प्रकार सातत्याने सुरू असल्याचेही त्यांनी म्हटले आहे़ मेळाव्यात गोंधळ घालून जिवे मारण्याचा कट आखण्यात आल्याचा दावाही त्यांनी केला. (प्रतिनिधी)
उदगीरच्या आमदारांना जिवे मारण्याची धमकी
By admin | Updated: August 18, 2014 02:56 IST