आजच्या डिजिटल युगात सोशल मीडिया हे केवळ मनोरंजनाचे साधन राहिलेले नाही, तर ते पैसे कमावण्याचे एक मोठे व्यासपीठ बनले आहे. सध्या इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे, ज्यामध्ये कानातले झुमके विकून चांगला नफा कसा मिळवता येईल, याचे सोपे मार्गदर्शन करण्यात आले आहे. अनेक तरुण आणि महिलांसाठी हा व्हिडिओ व्यवसायाची नवी दिशा देणारा ठरत आहे.
व्हिडिओमध्ये नेमकं काय आहे?व्हायरल व्हिडिओमध्ये एका बिझनेस इन्फ्लुएन्सरने कमी गुंतवणुकीत ज्वेलरी बिझनेस कसा सुरू करावा, हे सांगितले आहे. यामध्ये घाऊक बाजारातून स्वस्त दरात कानातले खरेदी करून ते इन्स्टाग्राम स्टोअर किंवा ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवर आकर्षक मार्केटिंगद्वारे कसे विकावे, याचे 'स्टेप-बाय-स्टेप' गणित मांडले आहे. एवढेच नाही तर झुमके विकण्याचा छोटासा स्टॉल लावून तुम्ही किती कमाई करू शकता, याचे उदाहरण देखील दिले आहे.
"व्यवसाय छोटा असो वा मोठा, तो करण्याची जिद्द आणि योग्य पद्धत माहित असेल तर पैशांचा पाऊस पडतो," हे 'धंदा ऑन ग्राउंड' या इन्स्टाग्राम पेजच्या एका व्हायरल व्हिडिओने सिद्ध केले आहे. दिल्लीच्या प्रसिद्ध सरोजनी नगर मार्केटमध्ये केवळ कानातल्यांचा स्टॉल लावून एका तरुणाने एका दिवसात चक्क ११,१०० रुपयांची विक्री केली आहे. सर्व खर्च वजा जाता त्याची एका दिवसाची निव्वळ कमाई ७,६०० रुपये झाली आहे. ही कमाई करण्यासाठी तुम्हाला एक करावे लागणार आहे, ते म्हणजे तुम्हाला पुण्याच्या एफसी रोडसारखा स्पॉट हवा जिथे तरुणी, महिलावर्ग मोठ्या प्रमाणावर खरेदीसाठी येतो.
काय आहे हे 'झुमका' बिझनेस मॉडेल?व्हायरल व्हिडिओमध्ये इन्फ्लुएंसरने आपला अनुभव शेअर करताना सांगितले की, त्याने घाऊक बाजारातून अवघ्या ८ रुपयांना एक याप्रमाणे झुमके खरेदी केले होते. हेच झुमके त्याने स्टॉलवर ३० रुपयांना विकले.
विक्रीचा वेग: सुरुवातीच्या केवळ ३ तासांत १५० झुमके विकले गेले.
दिवसभराची कमाई: रात्रीपर्यंत एकूण ३६० झुमक्यांची विक्री झाली, ज्यातून ११,१०० रुपये जमा झाले.
इन्फ्लुएंसरने दिलेल्या माहितीनुसार:
एकूण विक्री: ११,१०० रुपये
मटेरियलचा खर्च (खरेदी): ३,००० रुपये
स्टॉलचे भाडे: ५०० रुपये
एका दिवसाचा निव्वळ नफा: ७,६०० रुपये
या हिशोबाने महिनाभर हा व्यवसाय केल्यास सुमारे २.२८ लाख रुपये आणि वर्षाला तब्बल २७,३६,००० रुपये इतकी मोठी कमाई होऊ शकते.
Web Summary : Young entrepreneur earns lakhs selling earrings bought for ₹8 and sold for ₹30. Social media guides jewelry business success via online stores. Daily profit can reach ₹7,600.
Web Summary : युवा उद्यमी ₹8 में खरीदे गए झुमके ₹30 में बेचकर लाखों कमाता है। सोशल मीडिया ऑनलाइन स्टोर के माध्यम से आभूषण व्यवसाय की सफलता का मार्गदर्शन करता है। दैनिक लाभ ₹7,600 तक पहुँच सकता है।