शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! पालघरमधील मेलोडी फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
2
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
3
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
4
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
5
Shreyas Iyer : बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
6
नागपुरात आई अन् मुलानेच सुरू केलं सेक्स रॅकेट, व्हॉट्सअ‍ॅपवर फोटो पाठवायचे; रात्री...
7
पाकिस्तानात मोठी घडामोड! इम्रान खान तुरुंगातून बाहेर येणार? एकाचवेळी आठ प्रकरणांत मिळाला जामीन 
8
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!
9
स्वतःच्याच जाळ्यात अडकले डोनाल्ड ट्रम्प...! अमेरिकेत याच वर्षात 446 कंपन्या झाल्या दिवाळखोर!
10
राजनाथ सिंह आणि फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून पाठिंबा मागितला; संजय राऊतांचा दावा
11
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी
12
Asia Cup 2025 : टीम इंडिया आशिया कप स्पर्धेत पाकविरुद्ध खेळणार का? मोठी माहिती आली समोर
13
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका
14
Nashik House Collapses: नाशकात दुमजली घर कोसळलं, आठ महिलांसह नऊ जण जखमी
15
भारताच्या सीमेवर 'चिनी' पकड मजबूत होतेय? जिनपिंग यांनी तिबेटला दिले 'हे' नवे निर्देश!
16
१ लाखाचे केले १० कोटी रुपये, अनेकदा लागलं अपर सर्किट; एकेकाळी एका रुपयांपेक्षाही कमी होती किंमत
17
सप्टेंबरनंतर देशात अन् राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडतील; अंजली दमानियांचा दावा, म्हणाल्या...
18
रिलायन्समुळे मिळाला आधार; निफ्टी-सेन्सेक्स विक्रमी उच्चांकावर बंद; कोणत्या क्षेत्रात सर्वाधिक वाढ?
19
नजर खाली, काकाचा हातात हात...लग्नासाठी आलेली ५ स्थळे नाकारणारी अर्चना तिवारी घरी कशी पोहचली?
20
ऑनलाइन गेमिंगवर बंदी येण्यापूर्वी झुनझुनवालांची 'या' कंपनीतून एक्झिट; निखिल कामत, मधुसूदन केला यांना अजूनही विश्वास?

घाना...घाना...! बघता बघता दारुड्यांनी संघटना उभी केली; कधी नव्हे ती दरवाढ खटकली मग...

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 26, 2025 16:46 IST

Drunkards Association Of Ghana : वेगवेगळ्या संघटनांबाबत तुम्ही ऐकलं असेल, पण तुम्ही तळीरामांच्या म्हणजेच दारूड्या लोकांच्या संघटनेबाबत ऐकलं का? नक्कीच ऐकलं नसेल. 

Drunkards Association Of Ghana : हमारी मांगे पुरी करो..., असं कसं देत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही..., अशा घोषणा तुम्ही अनेकदा काही मोर्चांमध्ये ऐकल्या असतील. काही संघटना आपल्या मागण्यांसाठी अशा घोषणा देतात. आपला हक्क मिळवण्यासाठी किंवा हक्काचं संरक्षण करण्यासाठी एकजुट असणं फार महत्वाचं असतं. म्हणून जगभरात वेगवेगळ्या संघटना असतात जसे की, शिक्षक संघटना, रेल्वे कर्मचारी संघटना, मजुर संघटना अशा वेगवेगळ्या कर्मचाऱ्यांच्या किंवा लोकांच्या संघटना असतात. वेळ पडेल तेव्हा या संघटनांमधील लोक एकत्र येतात आणि आपल्या हक्काची मागणी करतात.

वेगवेगळ्या संघटनांबाबत तुम्ही ऐकलं असेल, पण तुम्ही तळीरामांच्या म्हणजेच दारूड्या लोकांच्या संघटनेबाबत ऐकलं का? नक्कीच ऐकलं नसेल.  पण खरंच अशी एक संघटना आहे. पण प्रश्न असाही आहे की, तळीराम म्हणजेच दारूड्या लोकांची अशी काय मागणी असेल की, त्यांना विरोध प्रदर्शन करण्याची गरज पडली. तुम्हाला वाचून आश्चर्य वाटेल की, आफ्रिकेच्या घानामध्ये (Drunkards Association Of Ghana ) तळीरामांची असोसिएशन आहे आणि या लोकांनी सरकारकडे त्यांच्या मागण्यांबाबत अल्टीमेटमही दिला आहे.

ही खरंच अचंबित करणारी बाब आहे की, घानामध्ये तळीरामांनी एक संघटना सुरू केली आणि त्यांनी आता दारूचे वाढलेले भाव कमी करण्यासाठी सरकारकडे मागणी केली आहे. वाचून धक्का बसेल की, या संघटनेचे पूर्ण देशात तब्बल ६.६ मिलियनपेक्षा जास्त सदस्य आहेत. काही दिवसांपूर्वी एक्सवर व्हायरल झालेल्या एका पोस्टमध्ये या संघटनेचे अध्यक्ष, मोसेस ओन्याह, ज्यांना लोक प्रेमानं 'ड्राय बोन' असं म्हणतात. त्यांनी दारूच्या वाढलेल्या भावावर टिका केली.

दरम्यान, घानातील राष्ट्रीय करन्सी सेडीच्या मूल्यात अचानक वाढ झाल्यानं दारूच्या किंमतींमध्येही भरपूर वाढ झालीये. त्यानंतर निराश झालेल्या तळीरामांच्या संघटनेतील सदस्यांनी अकरा शहरांमध्ये मोर्चा काढला आणि सरकारकडे दारूच्या किंमती कमी करण्याची मागणी केली.

ड्रंकर्ड्स असोसिएशननं घानाचे राष्ट्राध्यक्ष जॉन ड्रामानी महामा आणि व्यापार व उद्योग मंत्र्यांकडे यात हस्तक्षेप करण्याची मागणी केली. सोबतच सरकारला ही समस्या सोडवण्यासाठी तीन आठवड्याचा वेळही दिला आहे. असं झालं नाही तर देशव्यापी प्रदर्शन केलं जाईल, असं सांगण्यात आलं.

ड्राय बोन अकरामध्ये मोर्चादरम्यान म्हणाला होता की, आम्ही केवळ दारूडे नाहीत, आम्ही जबाबदार नागरीक आहोत, जे चांगला व्यवहार आणि योग्य दरात मद्याची मागणी करत आहोत. दारूच्या वाढलेल्या किंमतींमुळे घानामधील लोक वैतागले आहेत. घाना ड्रिंकर्स असोसिएशन लोकांना दारू पिण्यास प्रवृत्त करतात. सोबतच दारू पिऊ गाडी चालवल्यावर होणाऱ्या धोक्यांबाबत जागरूकताही पसरवतात.

टॅग्स :Jara hatkeजरा हटकेInternationalआंतरराष्ट्रीय