माणसांचं पाळीव प्राण्यांशी असलेलं नातं काही वेगळंच! कुटुंबातील व्यक्तींप्रमाणेच घरातील कुत्रा किंवा मांजर यांचा लळा लागलेला असतो. घरातील लोक नजरेआड झाल्यास पाळीव प्राणी लगेच अस्वस्थ होतात. मालकांसाठी किंवा कुंटूंबासाठी जीवाची बाजी लावण्याची पाळीव प्राण्यांची तयारी असते. आज आम्ही तुम्हाला अशाच एका घटनेबद्दल सांगणार आहोत. तुमचा विश्वास बसणार नाही पण आपल्या हरवलेल्या मालकापर्यंत पोहोचण्यासाठी एका कुत्र्याने २६ दिवसात ६० किमीचा रस्ता पार केला आहे. ही घटना चीनमधील आहे. एक कुटूंब फिरायला गेले असताना ते आपल्या कुत्र्याला विसरून आले. अशावेळी या कुत्र्यानं हिंमत न हारता मालकाला भेटण्यासाठी तब्बल ६० किलोमीटरचा रस्ता पार केला आहे.
या घटनेमुळे प्राणीतज्ज्ञ आणि कुत्र्याचे मालकही हैराण झाले आहे. कुत्र्याला पाहिल्यानंतर त्या कुटूंबाचा आनंद गगनात मावेनाासा झाला होता. इतक्या दिवसांपासून बाहेर फिरत असल्यामुळे कुत्रा खूप कमकुवत आणि थकलेल्या अवस्थेत होता. शरीरावर घाण, धुळीचे डाग पडले होते. समोर आलेल्या माहितीनुसार हा कुत्रा जवळपास ७ वर्षापासून 'कियू' यांच्यासोबत राहत होता. अरेरे! लॉकडाऊनमुळे आईची नोकरी गेली; १४ वर्षीय मुलगा रस्त्यावर चहा विकून चालवतोय घर