शहरं
Join us  
Trending Stories
1
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
2
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
3
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
4
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
5
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
6
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
7
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
8
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
9
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
10
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
11
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
12
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
13
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
14
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
15
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
16
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
17
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
18
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
19
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
20
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
Daily Top 2Weekly Top 5

दुर्मीळ पालीची किंमत एक कोटी रुपये, आंतरराष्ट्रीय तस्करी बाजारपेठेत प्रचंड मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2017 01:39 IST

आंतरराष्ट्रीय तस्करीच्या बाजारपेठेत टोके गेको नावाच्या पालीला प्रचंड मागणी आहे. ही पाल दुर्मीळ आहे. या पालीचा वापर पौरुषत्व वाढवण्याच्या औषधात केला जातो. तिच्या मांसापासून मधुमेह, नपुसंकत्व, एड्स आणि कर्करोगावरील औषधे बनवली जातात.

आंतरराष्ट्रीय तस्करीच्या बाजारपेठेत टोके गेको नावाच्या पालीला प्रचंड मागणी आहे. ही पाल दुर्मीळ आहे. या पालीचा वापर पौरुषत्व वाढवण्याच्या औषधात केला जातो. तिच्या मांसापासून मधुमेह, नपुसंकत्व, एड्स आणि कर्करोगावरील औषधे बनवली जातात.मणिपूर, मिझोराम, नागालँड आणि आसाममध्ये या पालीच्या तस्करांची संख्या वाढत आहे. टोके गेको पालीची तस्करी ईशान्य भारतीय राज्यांतून दक्षिणपूर्व अशियायी देशांत केली जाते. दक्षिण पूर्व अशियायी देशांमध्ये तिला मोठी मागणी आहे.तेथील लोकांना असे वाटते की गेकोच्या मांसापासून बनवलेल्या औषधांमुळे अनेक आजारांवर उपचार होऊ शकतात. इंडोनेशिया, बांगलादेश, ईशान्य भारत, फिलिपिन्स आणि नेपाळमध्ये सापडणा-या या पालीची किमत एक कोटी रुपयांपर्यंत सांगितली जाते.म्यानमारमध्ये राहणारे व्यापारी या पालींना चीन, इंडोनेशिया, फिलिपिन्स व दुस-या दक्षिण पूर्व अशियायी देशांना विकतात. पालीला असलेली मोठी मागणी ही लोकांमधील अंधश्रद्धेचाच एक भाग आहे म्हणून तर लोक ही पाल कुठे दिसते का म्हणून तिचा शोध घेत फिरत असतात. विदेशांत या पालीला खूप मागणी आहे.एक किलो टोकेच्या मांसापासून तयार केलेल्या औषधाला आंतरराष्ट्रीय बाजारात १० हजार युरोपर्यंतची रक्कम मिळू शकते. त्यामुळे लोक या पालीला पकडून मारून टाकून आंतरराष्ट्रीय बाजारात विकून पैसा कमावत आहेत. परिणामी ही पाल कायमची नष्ट होण्याची भीती आहे.