शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus: कोरोनाच काय, 'या' गावात पोहोचला नाही कुठलाच साथीचा आजार; कारण वाचून चकीत व्हाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2020 14:04 IST

बिहारच्या वैशालीमध्ये चक्क वटवाघळांची पूजा करणारं गाव

पाटणा: जगात सर्वत्र सध्या कोरोनाची दहशत पाहायला मिळतेय. आतापर्यंत ७ लाखांपेक्षा अधिक जणांना कोरोनाची बाधा झाली असून जवळपास ३४ हजार लोकांना जीव गमवावा लागलाय. भारतातल्या कोरोनाग्रस्तांचा आकडा १ हजारपेक्षा अधिक आहे. चीनच्या वुहानमधून कोरोना जगभरात पसरला. अनेकांनी कोरोनासाठी वटवाघळांना जबाबदार धरलं. मात्र भारतातल्या एका गावात वटवाघळांची पूजा केली जाते. अनेक जण कोरोनाच्या फैलावासाठी वटवाघळांना जबाबदार धरत आहेत. मात्र बिहारच्या वैशाली जिल्ह्यातल्या राजापाकरमधल्या सरसाई गावात वटवाघळांची कित्येक वर्षांपासून पूजा होत आहे. वटवाघळं सरसाई गावची रक्षक असून त्यांच्यामुळे समृद्धी येते, अशी ग्रामस्थांची श्रद्धा आहे. त्यामुळे वटवाघळं गावात कोणतंही शुभ कार्य सुरू करण्याआधी आयोजित करण्यात येणाऱ्या कार्यक्रमांचा अविभाज्य भाग असतात. वटवाघळांमध्ये भरभराट होते, संरक्षण होते, अशी ग्रामस्थांची भावना आहे.वटवाघळं संपूर्ण गावाचं रक्षण करतात, अनुचित प्रकार रोखतात, असं ग्रामस्थांना वाटतं. वटवाघळांमुळे आजार, साथीचे रोग गावापासून दूर राहतात, अशी त्यांची श्रद्धा आहे. गावाजवळच्या तलावाच्या शेजारी असलेल्या पिंपळाच्या झाडावर शेकडो वटवाघळं आहेत. 'एखादी अनोळखी व्यक्ती गावात येत असल्यास वटवाघळं जोरजोरात ओरडू लागतात. मात्र गावातली व्यक्ती येत असताना वटवाघळं अतिशय शांत असतात,' अशी माहिती ग्रामस्थांनी दिली. खूप वर्षांपूर्वी वैशाली जिल्ह्यात रोगाची साथ पसरली होती. तेव्हा वटवाघळांनी मोठ्या प्रमाणात स्थलांतर केली. ही वटवाघळं सरसाई गावात आली, असं ग्रामस्थांनी सांगितलं. वटवाघळं स्थलांतरित झाल्यानंतर एकही साथीचा रोग गावात आलेला नाही, अशी माहिती ग्रामस्थांनी दिली.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या