दिल्ली: कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लागू असलेला लॉकडाऊन काही प्रमाणात शिथिल करण्यात आला आहे. तिसऱ्या लॉकडाऊनमध्ये मद्यविक्रीला परवानगी देण्यात आल्यानंतर देशभरातल्या दारूच्या दुकानांबाहेर मोठ्या रांगा लागल्या. दिल्लीतल्या चंदेर नगर भागातही आज सकाळी मद्यप्रेमींनी दुकानाबाहेर रांग लावली होती. त्यावेळी एका व्यक्तीनं रांगेत उभ्या असलेल्या लोकांवर पुष्पवर्षाव केला.दारूच्या दुकानाबाहेर उभ्या असलेल्या लोकांवर पुष्पवृष्टी करणाऱ्या व्यक्तीचा व्हिडीओ एएनआय वृत्तसंस्थेनं ट्विट केला आहे. तुम्ही देशाची अर्थव्यवस्था आहात. सरकारकडे पैसा नाही, असं म्हणत दिल्लीच्या चंदेर नगर भागात लागलेल्या रांगेवर एका व्यक्तीनं पुष्पवर्षाव केला. गेल्या ४० दिवसांपासून मद्यविक्री बंद होती. मात्र कालपासून देशभरात मद्यविक्रीला सुरुवात झाली. त्यानंतर देशभरातल्या दारूच्या दुकानांबाहेर लांबचलांब रांगा लागल्याचं चित्र पाहायला मिळालं.
VIDEO: तुम्ही तर देशाची अर्थव्यवस्था; मद्य खरेदीसाठी आलेल्यांवर पुष्पवर्षाव
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 5, 2020 11:38 IST