शहरं
Join us  
Trending Stories
1
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
2
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
3
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
4
रिस्क घेतली अन् दीड कोटीची सॅलरी सोडून 'तो' भारतात आला; १२ जणांच्या साथीनं उभारला उद्योग
5
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
6
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
7
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
8
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
9
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
10
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
11
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
12
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
13
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
14
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
15
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
16
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
17
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
18
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!

पोरानं रागात घेतला नागाचा २-३ वेळा चावा; साप तडफडून मेला, डॉक्टर म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 5, 2022 17:23 IST

ही पहिलीच वेळ आहे की, विषारी नाग कोब्रा मुलाला चावला आणि उपचारादरम्यान तो वाचला.

जशपूर जिल्ह्यातील तपकरासह इतर भागात सर्पदंशाची अनेक प्रकरणे समोर येत आहेत. दरवर्षी येथे १२ हून अधिक आदिवासींचा सर्पदंशाने मृत्यू होतो. मात्र यावेळी आदिवासी भागातील गार्डन तालुक्यात असलेल्या पंडरापथ गावात एक अनोखा प्रकार समोर आला आहे. इकडे घरात खेळत असलेल्या एका मुलाला कोब्रा साप चावला, वेदनेने रडत असताना त्या मुलालाही राग आला आणि त्याने त्याच सापाला पकडून २-३ ठिकाणी दातांनी चावा घेतला. आश्चर्य म्हणजे उपचारानंतर ८ वर्षांचा निष्पाप वाचला, मात्र कोब्रा सापाचा मृत्यू झाला.

विशेष म्हणजे ज्या मुलाला साप चावला आहे, तो छत्तीसगडमधील लुप्त होत चाललेल्या कोरवा जमातीतील आहे. या जमातीचे लोक राष्ट्रपतींचे दत्तक पुत्रही मानले जातात. ही प्रजाती वाचवण्यासाठी सरकार दरवर्षी करोडो रुपये खर्च करते. सर्पदंशानंतर मृत्यूच्या दाढेतून परत आलेला ८ वर्षीय दीपक म्हणाला, मी माझ्या बहिणीसोबत अंगणात खेळत असताना अचानक मागून एक साप आला आणि माझ्या पाठीवर चढला. जेव्हा मला साप चावला तेव्हा त्याचा खूप राग आला, मी पळून जाणाऱ्या सापाला पकडले आणि दाताने चावा घेतला. 

आई बहिणीनं रुग्णालयात नेले...त्यानंतर लगेचच दीपकने आपल्या बहिणीला त्याला साप चावल्याचं सांगितले, त्यानंतर आई आणि बहिणीने त्याला रुग्णालयात नेले. आपल्या मुलाला साप चावला होता आणि मुलानेही रागाच्या भरात त्याच सापाला चावला असल्याचं आईने सांगितले. दीपकची बहीणही सांगते की, माझा भाऊ माझ्याकडे धावत आला आणि मला साप चावल्याचं सांगितले. मग आई आणि आम्ही मिळून त्याला दवाखान्यात नेले. ही पहिलीच वेळ आहे की, विषारी नाग कोब्रा मुलाला चावला आणि उपचारादरम्यान तो वाचला. मात्र मुलाच्या चाव्यामुळे सापाचा मृत्यू झाला. 

सर्प तज्ज्ञांना काय वाटतं?या आश्चर्यकारक घटनेबाबत जशपूर जिल्ह्यातील सर्प तज्ज्ञ डॉ. केसर हुसेन यांनी सांगितले की, साप चावल्यावर त्याचे विष शरीरात सोडतो, परंतु या प्रकरणात सापाने मुलाला चावल्यानंतर त्याचे विष शक्यतो सोडले नाही अशा वेळी सर्पदंशाचा जीव वाचतो आणि त्यावर उपचाराने जीव वाचला असं काही लोकांचे मत आहे. सत्य हे आहे की साप चावला, पण त्याने विष सोडले नाही असं त्यांनी सांगितले. या घटनेनं जशपूर जिल्ह्यासह आजूबाजूच्या परिसरात मोठ्या प्रमाणात अंधश्रद्धा पसरली आहे. कोब्रासारख्या विषारी सापाने चावा घेतल्यानंतर मुलाला काहीही झाले नाही, परंतु जेव्हा मुलाने सापाला चावलं तेव्हा त्याचा मृत्यू झाला. हा देवाचा चमत्कार मानून आदिवासी भागातील लोक दूरदूरवरून त्या बालकाला पाहायला येत आहेत.

दुखापतीमुळे साप मरण पावलात्याचवेळी जशपूर जिल्ह्यातील डॉ. लक्ष्मीकांत बापट सांगतात की, दीपकला जेव्हा साप चावला, तेव्हा त्याला विषरोधी इंजेक्शन देऊन उपचार करण्यात आले. पण त्याने ज्या सापाला चावलं त्याचा मृत्यू जखमी होऊन झाल्याचं डॉक्टर म्हणाले. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"