शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

काय सांगता? तब्बल 33 वर्षे फक्त चहा पिऊन जगतेय "ही" महिला, 'चायवाली चाची'ला पाहून डॉक्टरही हैराण

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2021 20:32 IST

Chai Wali Chachi : गेल्या काही वर्षांपासून चहा पिऊनही पल्ली देवी यांच्या आरोग्यावर कोणताच परिणाम झालेला नाही.

नवी दिल्ली - सकाळच्या वाफळलेल्या चहाने अनेकांच्या दिवसाची सुरुवात होते. आपापल्या परीने प्रत्येक जण कडक चहासोबत कामाची सुरुवात करत असतो. काहींचं तर कामाच्या ठिकाणी दिवसातून बऱ्याचदा चहा पिणं होतं. मात्र एखादी व्यक्ती 33 वर्षे चहा पिऊन जगतेय असं कोणी सांगितलं तर सुरुवातीला कोणीचं विश्वास ठेवणार नाही पण हो हे खरं आहे. छत्तीसगडमधील एक महिला गेल्या 30 वर्षांहून अधिक काळ फक्त चहावरच जगते आहे. पल्ली देवी असं महिलेचं नाव असून त्या कोरिया जिल्ह्यातील बदरिया गावच्या रहिवासी आहेत. फक्त चहावर जगत असल्याने डॉक्टरही हैराण झाले आहेत. 

पल्ली देवी गेल्या 33 वर्षांपासून फक्त आणि फक्त चहा पिऊनच जिवंत आहेत. इतकी वर्षे त्यांनी अन्नाचा कणही घेतला नाही. चायवाली चाची म्हणून त्या लोकप्रिय होत्या. 1985 मध्ये त्यांचं लग्न झालं पण लग्नानंतर त्या पहिल्यांदा माहेरी आल्या त्या परत सासरी गेल्याच नाही. पल्ली देवी यांचे वडील रतिराम यांनी त्यांच्या चहाच्या सवयीबाबत सांगितलं आहे. पल्ली देवी सहावीत होत्या तेव्हाच त्यांनी जेवण सोडलं. तर भावानं आपल्याला जेव्हापासून समजायला लागलं तेव्हापासून आपण बहिणीला असंच पाहत आल्याचं सांगितलं.

घरमध्ये ज्या ठिकाणाहून दूध आणलं जायचं त्या दूध विक्रेत्याला पैसे द्यायला उशीर झाल्यानंतर त्यांनी खूप सुनावलं होतं. तेव्हापासून आपली बहीण काळा चहा पिऊ लागली अशी माहिती भावाने दिली आहे. गेल्या काही वर्षांपासून चहा पिऊनही पल्ली देवी यांच्या आरोग्यावर कोणताच परिणाम झालेला नाही. ती पूर्णपणे ठणठणीत आहे, यामुळे डॉक्टरही हैराण झालेत. चहा पिण्याची असल्याने त्यांना कोणता आजार आहे की नाही याची तपासणी करण्यात आली. मात्र डॉक्टरांना अशा कोणत्याही आजाराची माहिती झाली नाही. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

टॅग्स :Chhattisgarhछत्तीसगड