शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

कोट्यवधीची कॅश बेवारस अवस्थेत धूळ खात पडली; ९ महिने कुणीही नाही पाहिली, मग...

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 22, 2021 12:58 IST

डेली मेलच्या रिपोर्टनुसार, मागील महिन्यात प्रोफेसर विनोद मेनन यांना त्यांच्या ऑफिसमध्ये रोकड असलेली एक पैशाची बॅग हाती लागली.

अचानक पैशांनी भरलेली बॅग तुमच्या हाती लागली तर तुम्ही काय कराल? पैसे पाहून सगळ्यांनाच हाव सुटते. त्यात जर नोटांनी भरलेली बॅग असेल तर डोळे फिरतील. मात्र सोशल मीडियावर एका बातमीनं सगळ्यांनाच हैराण केले आहे. चक्क नोटांनी भरलेली बॅग डोळ्यासमोर असूनही तिला हात न लावणाऱ्या प्रोफेसरची ही कहानी आहे. नेमकं काय घडलं? या बॅगला हात न लावण्यामागे काय कारण होतं? हे आपण जाणून घेऊया.

अमेरिकेच्या न्यू यॉर्क येथील सिटी कॉलेजचे प्रोफेसर डॉ. विनोद मेनन यांना त्यांच्या ऑफिसमध्ये रोकड भरलेली नोटांची बॅग सापडली त्यात तब्बल १,८०००० डॉल म्हणजे १ कोटी ३६ लाख रुपये होते. ही बॅग पाहून मेनन थक्क झाले. इतके सगळे पैसे एका अनोळखी व्यक्तीने पाठवले होते. ज्यांनी यापूर्वी याच कॉलेजमध्ये शिक्षण घेतले आहे. कॅशसोबत त्याने एक पत्रही पाठवले होते. ज्यात ही रक्कम कशासाठी आणि कोणाला पाठवली? याबाबत खुलासा केला होता.

बॅगेत दिड कोटींची कॅश

डेली मेलच्या रिपोर्टनुसार, मागील महिन्यात प्रोफेसर विनोद मेनन यांना त्यांच्या ऑफिसमध्ये रोकड असलेली एक पैशाची बॅग हाती लागली. ज्यात जवळपास दिड कोटी रुपये रोख होते. ही बॅग नोव्हेंबर २०२० मध्ये प्रोफेसर यांच्या कार्यालयात पाठवली होती. परंतु कोरोनामुळे कॉलेज बंद होते त्यामुळे कुणाचाही त्यावर नजर पडली नाही. कोट्यवधी रुपये बॅगेत ९ महिने धूळ खात पडले होते.

कशासाठी पाठवली होती बॅग?

प्रोफेसर विनोद मेनन यांना या बॅगेत एक पत्र सापडलं. त्यावर डिलिवरी पत्ता प्रोफेसर विनोद यांच्या कार्यालयाचा लिहिला होता. म्हणजे ही बॅग प्रोफेसर विनोद मेनन यांनाच पाठवण्यात आली होती. ज्या व्यक्तीने ही बॅग पाठवली होती त्याने प्रो. विनोद मेनन यांच्या हाताखालीच शिक्षणाचे धडे गिरवले होते. हा एक कॉलेजचा माजी विद्यार्थी होता. जो मेनन यांच्या मार्गदर्शनासाठी शिकत होता. त्याने ही पैशांची बॅग पाठवली.

विद्यार्थ्याने रोख रक्कम असलेल्या या बॅगेसोबत एक पत्र पाठवलं होते. त्यात म्हटलं होतं की, या कॉलेजमध्ये माझं उत्तम शिक्षण झालं. त्याचप्रकारे अशा शिक्षणाचा फायदा इतरांना घेता यावा. म्हणून कॉलेजला डोनेशन म्हणून ही रक्कम पाठवली आहे. बॅग पाठवणाऱ्याने सिटी कॉलेजमधून पदवी घेतली होती. या पैशाचा वापर ज्युनिअर आणि सिनिअर विद्यार्थ्यांचा भौतिकशास्त्र आणि गणिताचा अभ्यास करणार्‍यांना मदत करणे, ज्यांना त्यांचा अभ्यास सुरू ठेवण्यासाठी आर्थिक मदतीची आवश्यकता आहे अशांसाठी पैशाचा वापर करावा असं म्हटलं होतं.

प्रोफेसर विनोद मेनन काय म्हणाले?

प्रोफेसर विनोद मेनन म्हणाले की, सुरुवातीला इतके पैसे पाहून मला झटकाच बसला. हे पत्र वाचून मला या संस्थेसोबत काम करत असल्याचा गर्व आणि अभिमान आहे. या संस्थेने विद्यार्थ्यांच्या आयुष्यात चांगला बदल करुन आणला आहे. मी माझ्या खऱ्या आयुष्यात इतके पैसे कधीच बघितले नाहीत. हे सगळं सिनेमात होतं. त्यामुळे मी हैराण झालो. हे पैसे पाहून मी काय बोलू तेच कळत नाही.