शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
5
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
6
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
7
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
8
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
9
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
10
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
11
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
12
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
13
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
14
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
15
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
16
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
17
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
18
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
19
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
20
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
Daily Top 2Weekly Top 5

पंख असूनही उडू न शकणारे पक्षी

By admin | Updated: May 11, 2017 00:35 IST

पंख असूनही उडता न येणारे अनेक पक्षी आहेत. आज अशा पक्ष्यांची माहिती देणार आहोत जे उडता येत नसूनही खूप प्रसिद्ध आहेत.

पंख असूनही उडता न येणारे अनेक पक्षी आहेत. आज अशा पक्ष्यांची माहिती देणार आहोत जे उडता येत नसूनही खूप प्रसिद्ध आहेत. शहामृग : जगातील सर्वाच मोठ्या पक्ष्यांपैकी एक असलेला शहामृग जमिनीवर ७० कि. मी. प्रतितास एवढ्या वेगाने पळतो. आफ्रिका आणि त्याच्या आसपासच्या भागात आढळणारा हा शानदार पक्षी पंख असूनही उडू शकत नाही. ताकाह : ताकाह पक्षी दक्षिण बेटावर आढळून येतो. १९४८ मध्ये त्याचा शोध लागला होता. ताकाहलाही पंख असतात; मात्र तो त्यांचा उडण्यासाठी उपयोग करू शकत नाही. वेका : वेका पक्षी दिसायला खूपच आकर्षक असतो. त्याला पंखही असतात; मात्र त्यालाही उडणे माहिती नाही. हा पक्षी न्यूझीलंडमध्ये अनेक ठिकाणी आढळतो. काकापो : काकापो या पक्ष्याला घुबड पोपटही म्हणतात. हा पक्षी न्यूझीलंडमध्ये आढळून येतो. कोल्डफिश, माऊंट आइसलॅण्ड आणि लिटिल बेरिअर आइसलॅण्ड बेटांवर त्यांचे वास्तव्य आहे. यालाही उडता येत नाही.पेंग्विन : अंटार्टिका बेटावर आढळणारा पेंग्विन पक्षीही उडू शकत नाही. पेंग्विन पाण्यात सात मिनिटे माशांचा शोध घेऊ शकतो. एक प्रौढ पेंग्विन एका दिवसात ४५० वेळा शिकारीसाठी पाण्यात उतरू शकतो. अर्थात यालाही उडणे माहीत नाही. फाल्कलॅण्ड स्टीमर डक बदक प्रजातीतील हा पक्षी दक्षिण अटलांटिक आइसलॅण्डवर आढळून येतो. त्याला पंख असतात; मात्र तरीही तो उडू शकत नाही. नार्दर्न कॅसोरी : रंगीत, चमकदार मानेमुळे हा पक्षी कोणालाही ओळखता येतो. कॅसोरीही उडू शकत नाही. लिटिल स्पॉट किवी : लिटिल स्पॉट किवी हा पक्षी न्यूझीलंडचा आहे. आपल्या प्रजातीतील ही सर्वात छोटी चिमणी असून तिलाही उडता येत नाही. इमू : इमू आॅस्ट्रेलियाचा पक्षी आहे. १.९ मीटर एवढी उंची असणारा इमू शहामृगानंतरचा जगातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा पक्षी आहे. अर्थात हा देखील उडू शकत नाही.