शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

प्रेयसीला अंधारात भेटण्यासाठी इलेक्ट्रिशियन संपूर्ण गावाची बत्तीगुल करायचा; एक दिवस अचानक...

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 12, 2022 14:49 IST

संध्याकाळी अंधार पडल्यावर २ ते ३ तास गावात वीज नसायची; ग्रामस्थ वैतागले होते

पूर्णिया: बिहारमधील एक इलेक्ट्रिशियन संध्याकाळी संपूर्ण गावचा वीज पुरवठा खंडित करायचा. संध्याकाळी अंधारात प्रेयसीला भेटता यावं आणि याची कुणकुण कोणालाही लागू नये यासाठी इलेक्ट्रिशियन गावची वीज घालवायचा. अखेर एक दिवस इलेक्ट्रिशियनचं भांडं फुटलं आणि ग्रामस्थांनी त्याला रंगेहात पकडलं. पूर्णिया जिल्ह्यातील गणेशपूर जिल्ह्यात हा प्रकार घडला.

गणेशपूर गावचा वीजपुरवठा संध्याकाळी खंडित व्हायचा. संध्याकाळी अंधार पडल्यावर विशिष्ट वेळी २ ते ३ तासांसाठी वीज नसायची. विशेष म्हणजे यावेळी शेजारच्या गावांमध्ये मात्र वीज पुरवठा सुरळीत असायचा. त्यामुळे ग्रामस्थांना नेमकं काय होतंय ते कळेना. ग्रामस्थांना संशय आला. त्यांनी या सगळ्याच्या खोलात जाण्याचं ठरवलं आणि इलेक्ट्रिशियन रंगेहात पकडला गेला.

एकदा संध्याकाळी काही ग्रामस्थ जमले. आज काय तो सोक्षमोक्ष लावायचा याच तयारीनं सगळे एकत्र आले होते. जमलेल्या ग्रामस्थांनी स्थानिक सरकारी शाळा गाठली. तिथे  इलेक्ट्रिशियन आणि त्याची प्रेयसी आढळून आले. यानंतर ग्रामस्थांनी  इलेक्ट्रिशियनला ताब्यात घेतलं. मुंडण करून संपूर्ण गावात त्याची धिंड काढली. 

प्रेयसीला भेटायची इच्छा व्हायची, तेव्हा आपणच गावचा वीजपुरवठा खंडित करायचो, अशी कबुली  इलेक्ट्रिशियननं दिली. त्यानंतर ग्रामस्थांनी इलेक्ट्रिशियन आणि त्याच्या प्रेयसीचं लग्न लावून दिलं. यावेळी सरपंच आणि ग्रामपंचायतीचे सदस्य उपस्थित होते.