शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

जा, प्रभू रामांचं आधार कार्ड घेऊन या; सरकारी धान्य खरेदी केंद्रावर पुजाऱ्यासोबत घडला अजब प्रकार

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 10, 2021 17:09 IST

धान्याची विक्री करण्यासाठी गेलेल्या पुजाऱ्याला उपजिल्हाधिकाऱ्यांनी प्रभू श्रीरामांचं आधार कार्ड आणण्यास सांगितलं

बांदा: प्रभू रामाची नगरी असलेल्या उत्तर प्रदेशात एक अजब प्रकार घडला आहे. बांदा जिल्ह्यातील राम जानकी मंदिराच्या एका पुजाऱ्याकडे प्रशासनानं प्रभू श्रीरामाचं आधार कार्ड मागितलं आहे. मंदिर परिसरात पिकवलेलं धान्य विकत घेताना अतर्राचे एसडीएम सौरभ शुक्ला यांनी प्रभू रामचंद्रांचं आधार कार्ड मागितल्याचा आरोप पुजाऱ्यानं केला आहे. धान्य विकायचं असल्यास श्रीरामांचं आधार कार्ड घेऊन या, असं शुक्ला यांनी सांगितल्याचा आरोप पुजारी रामकुमार दास यांनी केला आहे.अतर्रा तहसीलमध्ये येत असलेल्या खुरवंड गावातील काही जमीन राम जानकी मंदिराच्या ताब्यात आहे. मंदिराचे पुजारी रामकुमार दास या जमिनीची देखभाल करतात. या जमिनीवर ते शेती करतात आणि येणारं पीक विकून त्यातून मिळणाऱ्या पैशातून मंदिराचा खर्च चालवतात. मात्र आता मंदिराच्या मालकीची जमिनीवर पिकणारं धान्य विकायचं कसं या चिंतेत रामकुमार दास आहेत. कारण अतर्राचे एसडीएम सौरभ शुक्ला यांनी त्यांच्याकडे शेताचे मालक म्हणजेच श्रीरामाच्या हाताचे ठसे घेऊन येण्यास सांगितलं आहे.या प्रकरणी विचारणा करताच अतर्राचे एसडीएम (उपजिल्हाधिकारी) सौरभ शुक्ला यांनी सारवासारव करण्याचा प्रयत्न केला. 'सरकारनं ठरवलेली प्रक्रियेचा संदर्भ देऊन मी धान्य खरेदी करण्यास असमर्थता दर्शवली होती. देवाचं आधार कार्ड आणण्याचा विषय कुठून आला याची माहिती पुजारीच सांगू शकतात,' असं शुक्ला म्हणाले. आधार कार्ड घेऊन या, असं मी कदाचित म्हटलं असेल. पण ते कोणत्या तरी वेगळ्या संदर्भात म्हटलं असेल, अशी सारवासारव शुक्ला यांनी केली.