बालभारतीची लॅमिनेटेड पुस्तके

By admin | Published: May 24, 2014 03:08 AM2014-05-24T03:08:09+5:302014-05-24T03:10:19+5:30

शाळा सुरू व्हायला तीन आठवडे शिल्लक असतानाच पहिली ते दहावीची बहुतांश पाठ्यपुस्तके बाजारात उपलब्ध झाली आहेत.

Balbharti's Laminated Books | बालभारतीची लॅमिनेटेड पुस्तके

बालभारतीची लॅमिनेटेड पुस्तके

Next

माधवी वाकोडकर, औरंगाबाद  -शाळा सुरू व्हायला तीन आठवडे शिल्लक असतानाच पहिली ते दहावीची बहुतांश पाठ्यपुस्तके बाजारात उपलब्ध झाली आहेत. यंदा प्रथमच पहिली ते चौथीपर्यंतची पुस्तके लॅमिनेशनसह आहेत. लॅमिनेटेड पुस्तकांचे आयुष्य वाढले असून, त्यांची पाने सहज वेगळी होणार नाहीत. तसेच पुस्तकांचे मुखपृष्ठ आकर्षक केल्यामुळे विद्यार्थ्यांची पुस्तकांबद्दल उत्सुकता टिकून राहील. पहिली ते पाचवीच्या चिमुकल्यांना भडक रंगांचे, चित्रांचे खूप आकर्षण असते. कार्टूनच्या जगात वाढणारी ही लहान मुले पाठ्यपुस्तकांपासून दूर राहणार नाहीत, अशी काळजी पुस्तकांत कार्टून चित्र देऊन घेण्यात आली आहे. ही पुस्तके वारंवार हाताळली तरी ती खूप दिवस टिकावीत यासाठी त्यांना लॅमिनेशनही करण्यात आले आहे. या पुस्तकांच्या छपाईसाठी मॅपलिथो नावाचा पांढराशुभ्र कागद वापरण्यात आला आहे. त्याचे वैशिष्ट्य म्हणजे या कागदावरील चित्रे आकर्षक आणि रंगांमध्ये उठावदार दिसतात. धडा समजून घेण्यासाठी उत्सुकता निर्माण करील अशा बोलक्या चित्रांची जोड त्याला देण्यात आली आहे. कार्टून मालिका बघणार्‍या मुलांचे पुस्तकांतील कार्टून चित्रांमुळे पुस्तकांशीही जवळीक राहील, अशी अपेक्षा आहे.

Web Title: Balbharti's Laminated Books

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.