शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

जगातील सर्वात लांब काचेचा पूल, इथं जाणं एखाद्या अ‍ॅडव्हेंचरपेक्षा कमी नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2024 16:45 IST

Bach Long Bridge : जगभरातील पर्यटकांना आकर्षित कराणार हा पूल आहे.

Bach Long Bridge : जगभरात अनेक पूल आहेत. या पुलांवर बऱ्याच जणांना फिरायला आवडते, तर असे काही पूल आहेत. जिथे लोक जायला घाबरतात. दरम्यान, आज आम्ही तुम्हाला जगातील सर्वात मोठ्या काचेच्या पुलाबद्दल सांगणार आहोत. व्हिएतनाममध्ये असलेला बॅक लाँग ब्रिज हा जगातील सर्वात लांब काचेचा पूल असल्याचे म्हटले जाते. जगभरातील पर्यटकांना आकर्षित कराणार हा पूल आहे. या पुलाचे खास वैशिष्ट्य काय आहे? त्याबद्दल सविस्तर जाणून घ्या....

हा पूल किती मोठा आहे?व्हिएतनाममध्ये असलेला बॅक लाँग ब्रिज हा सर्वात लांब काचेचा पूल असल्याचे म्हटले जाते. त्याला इंग्रजीत 'व्हाइट ड्रॅगन' असेही म्हणतात. दरम्यान, अनेकांना उंचीची भीती वाटते, अशा लोकांसाठी या पुलावर जाणे एखाद्या अॅडव्हेंचरपेक्षा कमी नाही. या पुलाचे वैशिष्ट्य म्हणजे हा पूल काचेने तयार केला आहे. अशा परिस्थितीत पायाखाली बघूनही त्यावरून चालणारे लोक घाबरतात. हा पूल 632 मीटर लांब म्हणजेच सुमारे 2,073 फूट आहे आणि त्याची उंची 150 मीटर म्हणजे 492 फूट आहे. या पुलाचा मजला फ्रेंच उत्पादकांनी बनवलेल्या एका विशिष्ट प्रकारच्या टेम्पर्ड काचेपासून बनवण्यात आला आहे, जो इतका मजबूत आहे की, या काचेच्या पुलावर एकावेळी 450 लोक आरामात चालू शकतात.

जगात काचेचे पूल कुठे आहेत?चीनच्या ग्वांगडोंगमध्ये 526 मीटर लांबीचा काचेचा तळाचा पूल (ग्लास बॉटम ब्रिज) आहे. याशिवाय पोर्तुगालमध्ये 1600 फूट काचेच्या तळाचा पूलही पूर्ण झाला आहे. भारतातील बिहार राज्यातील राजगीरमध्येही काचेचा पूल आहे. दरम्यान, हे काचेचे पूल पर्यटकांना खूप आकर्षित करतात. इतर अनेक देशांमध्ये काचेचे पूल आहेत. एका वृत्तवाहिनीशी बोलताना एका पर्यटकाने राजगीर पुलाला भेट दिल्याचा अनुभव सांगितला. या पर्यटकाने सांगितले की, काचेच्या पुलावरून चालताना थोडी भीती वाटते, कारण पायाखाली सर्व काही स्पष्ट दिसते. पण काचेमुळे आपण नैसर्गिक सौंदर्य देखील पाहू शकतो. कुटुंबाला अशी जागा खूप आवडते, असे त्यांनी सांगितले.

टॅग्स :VietnamविएतनामJara hatkeजरा हटके