शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
3
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
4
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
5
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
6
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
7
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
8
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
9
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
10
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
11
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
12
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
13
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
14
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
15
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
16
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
17
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
18
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
19
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
20
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
Daily Top 2Weekly Top 5

सोनं वाटलेला दगड अनमोल खजिना निघाला; सत्य समजताच आनंद गगनात मावेना

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 23, 2021 16:15 IST

सहा वर्षांपासून सोनं समजून लपवून ठेवला होता दगड; संग्रहातील तज्ज्ञांनी परीक्षण करताच सत्य समजलं

मेलबर्न: ऑस्ट्रेलियातील मेलबर्नमध्ये वास्तव्यास असलेल्या डेव्हिड हॉल नावाच्या व्यक्तीला अचानक लॉटरी लागली आहे. डेव्हिड यांनी अनेक वर्षांपासून त्यांच्या घरात एक दगड लपवून ठेवला होता. हा दगड म्हणजे सोनं असल्याची त्यांची समजूत होती. लाख प्रयत्न करूनही या दगडात सोनं आहे की नाही याची माहिती डेव्हिड यांना मिळाली नाही. त्यामुळे डेव्हिड १७ किलोचा दगड घेऊन मेलबर्नमधील संग्रहालयात पोहोचले.

संग्रहालयात काम करणाऱ्या तज्ज्ञांनी दगडाची पाहणी केली. त्याचे गुणधर्म तपासले. त्यामधून समोर आलेले निष्कर्ष पाहून त्यांना आश्चर्याचा धक्का बसला. कारण डेव्हिड यांच्याकडे असलेला दगड काही साधासुधा दगड नव्हता. तर ते अंतराळाची यात्रा करून आलेलं उल्कापिंड होतं. त्याची किंमत सोन्यापेक्षा जास्त असल्याचं डेव्हिड यांना समजलं. त्यामुळे त्यांना अत्यानंद झाला.

लाल आणि पिवळ्या रंगाचा दगड डेव्हिड यांना २०१५ मध्ये मेलबर्नमध्ये असलेल्या रिजनल पार्क परिसरात मिळाला. १९ व्या शतकात या भागात सोन्याचे अनेक दगड वाहून आले होते. त्यामुळे या भागात सोनं सापडेल अशी आशा अनेकांना असते. आपल्याला सोन्याचा दगड मिळाल्याचं डेव्हिड यांना वाटलं होतं. त्यांनी सोनं मिळवण्यासाठी दगड फोडण्याचे प्रयत्न केले. मात्र हाती काहीच आलं नाही. त्यामुळे त्यांच्याकडे असलेला दगड रहस्य बनून राहिला.

काही दिवसांपूर्वीच डेव्हिड त्यांच्याकडे असलेला दगड घेऊन मेलबर्नमधील संग्रहालयात गेले. भूवैज्ञानिक डेरमोट हेन्री यांनी दगडाचं परीक्षण केलं. डेव्हिड यांच्याकडे असलेला दगड उल्कापिंड असल्याचं त्यांच्या लक्षात आलं. उल्कापिंड ४.६ अब्ज वर्षे जुनं असून ते १०० ते १ हजार वर्षांपूर्वी पृथ्वीवर कोसळलं असावं, असा अंदाज हेन्री यांनी वर्तवला.