ऑनलाइन लोकमत
पाटणा, दि. १२ - दोन मुलींनतरही मुलगा होत नसल्याच्या कारणावरून पत्नीशी झालेल्या कडाक्याच्या भांडणांनतर बिहारमध्ये एका माणसाने रागाच्या भरात स्वत:चेच गुप्तांग कापल्याची धक्कादायक घटना घडली आहे. सिवान जिल्ह्यातील खोजवा येथे हा प्रकार घडला आहे.
कतारमध्ये नोकरी करणारा हा ३० वर्षीय इसम महिन्याभराच्या सुट्टीवर घरी आला होता. दोन्ही मुलीच असल्यामुळे तो काही काळापासून नाराज होता. मुलगा होत नसल्याच्या मुद्यावरून त्याचे पत्नीशी अनेकवेळा भांडणही होत असे. शुक्रवारीही त्या दोघांमध्ये या विषयावरून कडाक्याचे भांडण झाले व रागाच्या भरात त्याने धारदार शस्त्राने स्वत:चे गुप्तांग कापले. या घटनेत तो गंभीर झाला असून त्याला उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले असल्याचे पोलीसांनी सांगितले. याप्रकरणी पुढील तपास सुरू आहे.