शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

बाबो! सलग १८ सेकंद एकाच दमात कोंबड्याने बांग दिली, मग...; Video व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 8, 2022 17:46 IST

प्रसिद्ध उद्योगपती आनंद महिंद्रा यांनी ट्विटरवर व्हिडीओ शेअर केला. त्याला अनेकांनी कमेंट्स दिल्या.

उद्योगपती आनंद महिंद्रा(Anand Mahindra) सोशल मीडियावर विशेष म्हणजे ट्विटरवर खूप एक्टिव्ह असतात. अनेकदा त्यांचे ट्विट चाहत्यांसाठी प्रेरणादायी असतात. काही मोटिवेशनल तर कधी कधी फनी ट्विटही ते पोस्ट करत असतात. अलीकडेच महिंद्रा यांनी एका कोंबड्याचा व्हिडीओ शेअर केला आहे. जो सलग एकाच सुरात बांग देत असतो आणि त्यानंतर जे घडतं त्याने तुम्हीही पोटभरून हसाल. 

आनंद महिंद्रा यांनी हा व्हिडिओ शेअर करत म्हटलंय की, हा माझ्या सिग्नल वंडर बॉक्समध्ये मिळाला. या कोंबड्याची कहानी आणि मेसेज समजण्याचा प्रयत्न करत होतो. त्यानंतर मी विचार केला की, या कोंबड्याच्या कथेबद्दल लोकांची मते गोळा करणे अधिक मनोरंजक असेल. तुम्ही लोक या बाबत तुमचे मत द्या असं त्यांनी विनंती केलीय. महिंद्रा यांनी ट्विट करत लोकांच्या प्रतिक्रिया मागवल्या आहेत. काही मिनिटांतच या ट्विटला अनेकांनी प्रतिक्रिया दिल्या. 

व्हिडिओवर युजर्सच्या कमेंटचा पाऊसया व्हिडीओवर एका युजरने प्राण जाईल पण वचन नाही अशी कमेंट केली आहे. हे रिएक्शन स्वतः आनंद महिंद्रा यांनी रिट्विट केली होती, दुसर्‍या युजरने यातून काय शिकायला मिळालं त्याचे उत्तर दिले आहे. तो म्हणाला की, जेव्हा तुम्ही अर्थ नसताना आवाज उठवता तेव्हा त्याचा विपरीत परिणाम होतो. त्याचप्रमाणे, एकाने संस्कृत श्लोक शेअर करत लिहिले की जास्त करणे नेहमीच घातक ठरते. काही नेटिझन्सने सांगितले की या कोंबड्यापासून कधीही हार मानू नये ही शिकवण शिकायला मिळते. 

आनंद महिंद्रा यांनी यापूर्वी कर्नाटकातील शृंगेरी मंदिराचा फोटो शेअर केला होता. त्या फोटोत स्टील प्लेट्स एकावर एक ठेवल्या आहेत. सुंदर कलाकृतींचा ठसा उमटतो अशा पद्धतीने ते सजवलेल्या होत्या. महिंद्रा यांनी लिहिलं की, 'हे खूप सुंदर आहे. एखाद्या पुतळ्यासारखं.. कला, अचूकता आणि कार्यक्षमतेचा संगम. त्यांना एकत्र करण्याचा एक व्हिडिओ आहे का...' फोटो पोस्ट करणाऱ्या युजरने उत्तर दिले की त्याने हा व्हिडिओ बनवला नाही. परंतु पुढच्या वेळी तो मंदिरात गेल्यावर काळजी घेईल.  

टॅग्स :Anand Mahindraआनंद महिंद्रा