शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

अबू इवान्का अल अमरिकी - डोनाल्ड ट्रम्पचं सीरियन बारसं

By admin | Updated: April 8, 2017 12:19 IST

डोनाल्ड ट्रम्प सीरियामध्ये भलतेच लोकप्रिय झाले असून त्यांचं अबू इवान्का अल अमरिकी म्हणजे इवान्का या अमेरिकीचे पिता असं नामकरण करण्यात आलं आहे.

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 8 - बशर अल असद यांच्या रासायनिक हल्ल्याला जोरदार प्रत्युत्तर देत मिसाईल्स डागणारे डोनाल्ड ट्रम्प सीरियामध्ये भलतेच लोकप्रिय झाले असून त्यांचं अबू इवान्का अल अमरिकी म्हणजे इवान्का या अमेरिकीचे पिता असं नामकरण करण्यात आलं आहे. सीरियामध्ये यादवी माजली असून बंडखोरांवर असद यांच्या राजवटीने रासायनिक शस्त्रांचा वापर केल्याचे निष्पन्न झाले आहे. यामुळे अनेक लहान मुलं दगावली असून गेल्या अनेक दशकांमधला हा अपवादात्मक परंतु निघृण रासायनिक हल्ला मानण्यात येत आहे. या हल्ल्याचा निषेध करताना ट्रम्प यांच्या आदेशावरून अमेरिकी सैन्यानं असद यांच्या ज्या लष्करी तळावरून रासायनिक हल्ला केल्याचा संशय होता, त्या तळावर क्षेपणास्त्रांचा तुफानी मारा केला आणि असद सरकारला जबरदस्त धक्का दिला.
हा हल्ला इतका आकस्मिक आणि जोरदार होता की असद यांचा मित्र असलेल्या रशियाने अमेरिकी कारवाईचा निषेध केला तसेच, दोन्ही देशांचे संबंध बिघडतिल असंही बजावलं. मात्र, सीरियातल्या लोकांनी या कारवाईचं कौतुक करताना ट्रम्प यांच्यावर स्तुतीसुमनांचा वर्षाव केला आहे. काहिंनी तर ओबामा यांच्यापेक्षा ट्रम्प कार्यक्षम असून जे बोलतात ते करून दाखवतात असं प्रशस्तीपत्रकही दिलं आहे. 
 
ट्विटरच्या माध्यमातून ट्रम्प यांच्यावर झालेला कौतुकाचा वर्षाव...