शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

62 वर्षांत 28 निवडणुकांमध्ये झाला पराभव, तरीही करताहेत 29व्यांदा लढण्याची तयारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 1, 2019 15:20 IST

पु. ल. देशपांडे यांच्या अंतू बर्वा या व्यक्तिचित्रामध्ये सातत्याने निवडणुका लढून पराभूत होणाऱ्या अण्णू गोगटेविषयी तुम्ही वाचलंच असेल. पण प्रत्यक्षातही अशी एक व्यक्ती आहे

भुवनेश्वर - पु. ल. देशपांडे यांच्या अंतू बर्वा या व्यक्तिचित्रामध्ये सातत्याने निवडणुका लढून पराभूत होणाऱ्या अण्णू गोगटेविषयी तुम्ही वाचलंच असेल. पण प्रत्यक्षातही अशी एक व्यक्ती आहे जी गेल्या 62 वर्षांत एकूण 28 निवडणुका लढली असून, या सर्व निवडुकांमध्ये पराभूत झालीय. त्या व्यक्तीचे नाव आहे श्यामूबाबू सुबुधी. ओदिशा येथील श्यामबाबू सुबुधी या 84 वर्षीय गृहस्थांना निवडणुका लढवण्याचा छंद आहे. सलग 28 निवडणुकांमध्ये पराभूत झाल्यानंतर आता त्यांनी यावर्षी लोकसभा निवडणूक लढवण्याची तयारी सुरू केली आहे. 1957 पासून निवडणुका लढवत असलेले श्यामबाबू सुबुधी यांनी आतातपर्यंत 10 विधानसभा निवडणुका लढवल्या आहेत. तसेच आतापर्यंत नऊ लोकसभा निवडणुकीत नशीब आजमावले आहे. श्यामबाबू यांनी 1957 साली तत्कालीन मंत्री वृंदावन नायक यांच्याविरोधात निवडणूक लढवली होती. त्याबाबत श्यामबाबू म्हणतात की, मी मंत्री नायक यांच्याविरोधात हिंजली मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. त्यावेळी माझा पराभव झाला होता. त्यावेळी मी केवळ 22 वर्षांचा होतो. दरम्यान 1962 पासून मी नियमितपणे निवडणुका लढवण्यास सुरुवात केली. तेव्हापासून निवडणुका लढवणे हाच माझ्यासाठी एकमेव ध्यास बनला आहे. निवडणुकीत जय-पराजय होणे मला महत्त्वाचे वाटत नाही. एखादे दिवशी जनता मला निवडून देईल, असी अपेक्षा आहे.''  आयुर्वेदिक डॉक्टरचा व्यवसाय करणारे श्यामबाबू सुबुधी हे आपल्याकडील बहुतांश कमाई ही निवडणुकांवरच खर्च करतात. श्यामबाबू हे यंदा गंजम जिल्ह्यातील अस्का आणि बरहामपूर मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहेत. दरम्यान, त्यांनी पत्रके वाटून पुढील निवडणुकीसाठीच्या आपल्या प्रचाराला सुरुवात केली आहे. 

टॅग्स :ElectionनिवडणूकOdishaओदिशा