शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
4
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
5
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
6
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
7
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
8
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
9
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
10
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
11
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
12
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
13
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
14
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
15
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
16
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
17
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
18
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
19
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
20
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग

अर्धा किलो टॉमेटोच्या वजनाचं बाळं जन्माला आलं, सर्व म्हणतात; 'miracle baby'

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 27, 2022 19:19 IST

मिरॅकल बेबीचा जन्म अवघ्या पाच महिन्यांत झाला (Miracle Baby Born In 5 Months). होय, प्रसूतीच्या तारखेच्या ४ महिने आधी जगात आलेल्या या मुलाचा फोटो त्याच्या पालकांनी स्वतः लोकांसोबत शेअर केला होता.

जीवन आणि मृत्यू दोन्ही इश्वराच्या हातात आहेत, असे म्हणतात. एखाद्याचा मृत्यू व्हावा अशी देवाची इच्छा असेल, तर चालता-बोलता निरोगी माणूसही क्षणात जगाचा निरोप घेऊ शकतो. दुसरीकडे, जर देवाच्या कृपेने एखाद्याचे नशीब जोमात असेल, तर मोठी संकटेही त्याचे काही बिघडवू शकत नाहीत. अशीच काहीशी कहाणी घेऊन जन्माला आलेल्या मुलाचा फोटो सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे. या मिरॅकल बेबीचा जन्म अवघ्या पाच महिन्यांत झाला (Miracle Baby Born In 5 Months). होय, प्रसूतीच्या तारखेच्या ४ महिने आधी जगात आलेल्या या मुलाचा फोटो त्याच्या पालकांनी स्वतः लोकांसोबत शेअर केला होता.

इंग्लंडच्या कॅब्रिजशायर (Cambridgeshire) मध्ये राहणाऱ्या किम्बर्ली बयेर्स आणि तिचे पति ग्लेन Kimberley Byers and husband Glenn) यांनी त्यांचे बाळ सात महिन्यांचे झाल्यानंतर त्याचे फोटो लोकांसोबत शेअर केले. किम्बर्लीचा मुलगा रॉरीचा जन्म अवघ्या पाच महिन्यांत झाला.

किम्बर्ली गरोदर असताना वारंवार तिचे पोट दुखत असे. यासोबतच तिने १४ ब्लड ट्रांसफ्यूजन आणि अनेक प्रकारचे अँटीबायोटिक्स घेऊन तिनं गर्भावस्थेचा काळ कसाबसा घालवला. मात्र, याच दरम्यान अचानक पाचव्या महिन्यात प्रसूती वेदना सुरू झाल्या. संभाव्य प्रसुती तारखेच्या चार महिने आधी तिने रुग्णालयात मुलाला जन्म दिला.

३३ वर्षीय किम्बर्लीने जूनमध्ये सिझेरियनद्वारे मुलाला जन्म दिला. जेव्हा रोरीचा जन्म झाला तेव्हा त्याचे वजन अर्धा किलोपेक्षाही कमी होते. रॉरीला तातडीने आयसीयूमध्ये ठेवण्यात आले. मिरॅकल बेबीच्या जन्मामुळे सर्वजणच आश्चर्यचकित झाले होते. मात्र, 7 महिन्यांचे होऊनही डॉक्टर रोरीला रुग्णालयातच ठेवत आहेत. याचे कारण त्याच्या जीवाला अजूनही धोका आहे.

]खरं तर, रॉरीचा जन्म झाला तेव्हा तो खूपच लहान होता. मातेच्या गर्भाशयात ९ महिन्यांनंतर, मुलाचा पूर्ण विकास होत असतो. पण रॉरीचा जन्म चार महिन्यांपूर्वी झाला होता. त्यामुळे तो जगात आल्यावर त्याचा पूर्ण विकास होऊ शकला नाही. वडिलांच्या म्हणण्यानुसार, आतापर्यंतच्या प्रवासात त्यांनी अशा अनेक क्षणांचा सामना केला आहे, जेव्हा त्यांना वाटत होते की त्यांचे मूल या जगात राहू शकणार नाही. पण, हॉस्पिटलिस्टच्या मदतीने रॉरी आता 7 महिन्यांचा झाला आहे. तथापि, रोरी अद्याप त्याच्या घरी जाऊ शकला नाही. किम्बर्ली आणि तिचे पती घरी परतले पण रोरी अजून हॉस्पिटलमध्येच आहे. सर्वजण तो सुखरुप घरी पोहचावा यासाठी प्रार्थना करत आहेत.

टॅग्स :Jara hatkeजरा हटके