शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Rain: आजचा दिवस पावसाचा, संपूर्ण महाराष्ट्राला झोडपणार; चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
2
पाकिस्तानवर ‘फिरकी बाॅम्ब’; इंडियाचा मैदानावरही 'बदला'; हायव्होल्टेज सामन्यात पाकचा दणदणीत पराभव
3
सकाळपासून ते रात्री झोपेपर्यंतच्या सर्व उत्पादनांवर जीएसटी सवलत मिळणार; निर्मला सीतारामण यांचा दावा
4
आजचे राशीभविष्य- १५ सप्टेंबर २०२५: रागावर नियंत्रण ठेवा, कुटुंबियांशी वादविवाद टाळावेत!
5
‘जिल्हा परिषदां’ना बळ मिळेल? पूर्वी जिल्हा परिषद अध्यक्षांना राज्यमंत्री पदाचा दर्जा होता
6
सायबर भामट्यांनी साेडले खात्यात केवळ ८६ रुपये; बोलण्यात गुंतवून पाठवली लिंक
7
मी शिवभक्त, विष गिळून टाकतो, पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल; काँग्रेसने घुसखोरांना प्रोत्साहन दिले, गरिबांना नाकारले
8
महाराष्ट्रात एका वर्षात ‘आयुष्मान’चे लाभार्थी तिप्पट; ग्रामीण भागापर्यंत विस्तार करण्याचे राज्यासमोर आव्हान
9
पूजा खेडकरांच्या घरातून अपहृत चालकाची सुटका; ऐरोलीत अपघात, कारमध्ये कोंबून नेले पुण्याला
10
मोबाइलमध्ये अडकलेली तरुणाई सरस्वतीच्या दरबारात नेणार : विश्वास पाटील
11
प्रभादेवी तिकीट कार्यालयाचे स्थलांतर कुठे? २ ते ३ दिवसांमध्ये जागा निश्चित करणार
12
बांधकामातील बदल, कराने वाढला कोस्टल रोडचा खर्च; महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या शेवटच्या टप्प्यात २ हजार कोटींची वाढ
13
नेपाळच्या आगीत कोण आपली पोळी भाजते आहे?
14
साहित्य संमेलनाध्यक्षपदी ‘पानिपत’कार विश्वास पाटील ; १ ते ४ जानेवारीदरम्यान संमेलन होणार
15
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
16
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
17
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
18
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
19
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार

रिअल लाइफ कास्ट अवे! ३३ दिवस एका बेटावर अडकले होते ३ लोक, उंदीर आणि नारळ खाऊन राहिले जिवंत...

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2021 15:02 IST

यूएस कोस्ट गार्डचं(US Coast Guard) हेलिकॉप्टर या भागात रूटीन फेरफटका मारत होतं. तेव्हाच एअरक्राफ्टमध्ये बसलेल्या पायलटची नजर एका फडफडत्या झेंड्यावर पडली.

क्यूबाचे(Cuba) दोन पुरूष आणि एक महिला ३३ दिवस बाहामासच्या (Bahamas Island) एका निर्जन बेटावर फसले(Cast Away) होते. या बेटावर त्यांना खाण्यासाठी नारळांशिवाय काहीच नव्हतं. रिपोर्ट्सनुसार, या लोकांना यूएस कोस्ट गार्डने(US coast Guard) ९ फेब्रुवारीला या बेटावरून सुरक्षित बाहेर काढले. हे लोक गेल्या १ महिन्यांपासून एंग्युएला नावाच्या बेटावर अडकून बसले होते.

झालं असं की, यूएस कोस्ट गार्डचं हेलिकॉप्टर या भागात रूटीन फेरफटका मारत होतं. तेव्हाच एअरक्राफ्टमध्ये बसलेल्या पायलटची नजर एका फडफडत्या झेंड्यावर पडली. पायलटला जाणीव झाली की, तिथे असलेल्या लोकांना मदतीची गरज आहे. यूएस कोस्ट गार्डने या बेटावरील फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. यात त्या लोकांनी त्यांचा मेकशिफ्ट कॅम्पही दिसत आहे. 

त्यानंतर कोस्ट गार्डच्या सदस्यांनी खाण्याचे पॅकेट्स आणि पाणी हेलिकॉप्टरमधून खाली फेकले. त्यासोबत त्यांनी एक रेडिओही खाली टाकला. जेणेकरून त्यांच्या कम्युनिकेशन व्हावं. हे तीन लोक ८ फेब्रुवारीला या बेटावर आढळून आले होते. पण खराब वातावरणामुळे त्यांना रेस्क्यू करण्यासाठी दुसरा दिवस उगवावा लागला. 

या लोकांना तेथून बाहेर काढल्यावर फ्लोरिडातील मेडिकल सेंटरमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलं. यातील कुणालाही जखम झालेली नाही. या प्रकरणात प्रशासनाने सांगितलं की, या लोकांची बोट पलटी झाली होती. ज्यानंतर तिघेही स्वीमिंग करून बेटावर पोहोचले होते. मात्र तिघांनीही हिंमत सोडली नाही. ३३ दिवसांपर्यंत ते नारळं आणि उंदीर खाऊन जिवंत राहिले.

कोस्ट गार्ड लेफ्टिनंट जस्टिनने एनबीसी १२ सोबत बोलताना सांगितले होते की, पायलटने काही विचित्र झेंडे पाहिले होते. यात अनेक कलर्स होते. याच कारणामुळे ते आधी थोडे हैराण झाले होते. जेव्हा त्यांनी लक्ष देऊन पाहिलं तर ते लोक यांना सिग्नल देत होते. जस्टिन म्हणाला की, एक महिन्यानंतरही हे लोक चांगल्या शेपमध्ये होते. 

टॅग्स :AmericaअमेरिकाInternationalआंतरराष्ट्रीयInteresting Factsइंटरेस्टींग फॅक्ट्स