शहरं
Join us  
Trending Stories
1
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
2
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
3
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
4
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
5
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
6
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
7
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
8
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
9
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
10
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
11
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
12
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
13
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
14
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
15
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
16
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
17
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
18
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
19
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
20
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
Daily Top 2Weekly Top 5

२३ वर्षीय प्रियकर, ८३ वर्षीय प्रेयसी! अनोखी प्रेमकहाणी आली चर्चेत; मैत्रिणीच्या घरी गेला अन्...

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 5, 2025 07:00 IST

आयको सांगतात, कोफू हा इतका उत्साही, सळसळत्या रक्ताचा, सभ्य आणि देखणा तरुण आहे की, कोणीही त्याच्या प्रेमात पडावं. मीही त्याच्या प्रेमात पडले यात काय विशेष?

जपानमधला २३ वर्षांचा एक तरुण. अतिशय हुशार, देखणा. अनेक मुली त्याच्या प्रेमात आहेत; पण कोणाकडेही तो ढुंकूनही पाहत नाही. कोफू त्याचं नाव. नुकतंच त्याचं ग्रॅज्युएशन पूर्ण झालं. एका क्रिएटिव्ह डिझाइन कंपनीत तो इंटर्न आहे. कॉलेजमध्ये असताना त्याच्याभोवती मुलींचा कायम गराडा असायचा. त्यानं आपल्याकडे पाहावं, आपल्याला प्रपोज करावं, असं अनेक मुलींना वाटायचं. त्यामुळे त्या सारखं त्याच्या पुढे-पुढे करायचा; पण ‘मैत्रीण’ या नात्याशिवाय कोणत्याही तरुणीला त्यानं जास्त महत्त्व दिलं नाही. 

एकदा असंच तो आपल्या एका मैत्रिणीच्या घरी गेला. मैत्रिणीच्या घरच्यांशी गप्पा मारत असताना अचानक ‘ती’ समोर आली आणि दोघंही एकमेकांकडे पाहतच राहिले. भानावर आल्यावर त्यांनी गप्पांना सुरुवात केली. पहिल्या भेटीतच दोघंही एकमेकांना आवडले होते. आँखों ही आँखों से प्यार हो गया...आजवर इतक्या मुली कोफूच्या मागे होत्या; पण कोणालाच त्यानं भाव दिला नाही; मग ‘ती’ कोण होती, जिला पाहिल्याबरोबर त्याच्या हृदयाच्या तारा छेडल्या गेल्या? तिचं नाव आयको आणि ती होती त्याच्या मैत्रिणीची आजी! वय वर्षे ८३! आजींचा दोन वेळा विवाह झाला आहे आणि त्यांना मुलगा, मुलगी आणि पाच नातवंडं आहेत. घटस्फोटानंतर त्या आपल्या मुलाच्या कुटुंबासोबत राहत होत्या. 

प्रेमाला वय नसतं म्हणतात ते असं! पहिल्या भेटीतच आजीलाही कोफू खूपच आवडला. त्यानंतर दोघांनी एकमेकांना डेट करायला सुरुवात केली. २३ वर्षीय कोफूशी प्रेम जुळल्यावर आता त्या त्याच्यासोबत राहत आहेत. विशेष म्हणजे या दोघांच्या नात्याला त्यांच्या कुटुंबीयांनीही पाठिंबाही दिला आहे. दोघांनीही अलीकडेच एका मुलाखतीत आपली प्रेमकहाणी उघड केली आणि सोशल मीडियावर ही लव्ह स्टोरी ओसंडून वाहते आहे. या दोघांनीही नुकताच एक व्हिडीओ शेअर केला आहे. त्यात कोफू प्रेमानं ८३ वर्षांच्या आयकोचा हात हातात धरून बसलेला दिसतो. आयकोचा आवाज अतिशय मधुर आहे. नखं रंगवलेली आहेत आणि तिच्या स्टाइलिश लहान केसांमध्ये तिच्या वयापेक्षा ती खूपच तरुण आणि देखणी दिसतेय.

आयको सांगतात, कोफू हा इतका उत्साही, सळसळत्या रक्ताचा, सभ्य आणि देखणा तरुण आहे की, कोणीही त्याच्या प्रेमात पडावं. मीही त्याच्या प्रेमात पडले यात काय विशेष? कोफूचं व्यक्तिमत्त्वच असं आहे की त्याला पाहताच मुली आपोआप त्याच्याकडे आकृष्ट होतात. आम्ही दोघंही एकमेकांना अनुरूप आहोत, त्यामुळेच पहिल्या भेटीतच आमचं प्रेम जुळलं आणि व्हॅलेंटाइन डेच्या दिवशी आम्ही एकमेकांना प्रपोज केलं! आयकोही दिसायला अतिशय सुंदर आहेत. त्या ८३ वर्षांच्या आजीबाई आहेत, असं कुणीच म्हणणार नाही, इतकं त्यांनी स्वत:ला मेन्टेन ठेवलं आहे. या वयातही त्या नुसत्या व्यायामच करीत नाहीत, तर निरोगी जीवनशैली पाळतात, स्टाइलिश कपडे घालतात. त्यांची हेअर स्टाइलही अशीच हटके आहे. शिवाय आवाज आणि बोलणं तर इतकं मधाळ, की ऐकतच राहावं. वयातील मोठ्या फरकामुळे दोघंही सुरुवातीला आपली भावना उघड करण्यास संकोचत होते. मात्र आयकोच्या नातीसोबत डिझ्नीलँडला गेले असताना तिथे त्यांनी एकमेकांवरील प्रेम व्यक्त केलं आणि ही प्रेमकहाणी जगजाहीर झाली!

टॅग्स :World Trendingजगातील घडामोडी