शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

मृत्यूनंतर २ तासांनी युवक पुन्हा जिवंत झाला; डॉक्टर म्हणाले, "हा चमत्कारच..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2023 21:02 IST

सॅमीच्या निधनाची बातमी ऐकताच कुटुंबाला धक्का बसला. सगळ्यांच्या डोळ्यात पाणी होते.

देव तारी त्याला कोण मारी...ही म्हण सगळ्यांनीच ऐकली असेल. परंतु अनेकदा असे काही चमत्कार घडतात ज्यात मृत्यूनंतरही जिवंत होण्याचे दावे केले जातात. १६ वर्षीय मुलगा सॅमी बरकोसोबत असेच काहीसे घडले. हा मुलगा काही मिनिटांसाठी नव्हे तर पूर्ण २ तासांसाठी मृत झाला होता. टेक्सासच्या मिसौरी शहरात रॉक क्लाइबिंग करताना सॅमीला हार्ट अटॅक आला आणि त्याच्या शरीराने काम करणे बंद केले. २ तास सीपीआर दिलाअचानक सॅमीचा तब्येत ढासळल्याने त्याला रुग्णालयात आणले गेले. तिथे सॅमीच्या शरीराने उपचाराला प्रतिसाद दिला नाही. तरीही डॉक्टरांनी त्याला वाचवण्याचे प्रयत्न सोडले नाहीत. तब्बल २ तास सॅमीला सीपीआर देण्यात आला. त्याचा काही फायदा झाला नाही तेव्हा डॉक्टरांनी सॅमीच्या कुटुंबाला त्याचा मृत्यू झाल्याचे सांगितले. परंतु दैवाच्या मनात काही वेगळाच होतं. 

सॅमीच्या निधनाची बातमी ऐकताच कुटुंबाला धक्का बसला. सगळ्यांच्या डोळ्यात पाणी होते. परंतु त्याचवेळी कुटुंबातील एका सदस्याने सॅमीच्या शरीराची हालचाल पाहिली. ते पाहून त्याने मोठ्याने डॉक्टरांना आवाज दिला. डॉक्टर तातडीने त्याठिकाणी आले आणि सॅमीला उपचार केले. सॅमीच्या शरिरानेही प्रतिसाद दिला. ही गोष्ट एका चमत्कारापेक्षा कमी नसल्याचे डॉक्टर म्हणाले. देवाने आमचे ऐकलं, माझ्या मुलाला पुन्हा जिवंत केले अशी भावना सॅमीच्या आईने व्यक्त केली. 

डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, सॅमीच्या मेंदूपर्यंत ऑक्सिजनचा पुरवठा बराच काळ झाला नाही. त्यामुळे त्याला सूपर रेयर जेनेटिक डिसॉर्डर झाल्याने त्याच्या हार्टवर अफेक्ट झाला. सॅमीला शॉर्ट टर्म मेमोरी लॉस झाली होती. त्याला पूर्ण घटना लक्षात नाही. परंतु काही गोष्टी तुरळक लक्षात आहेत. त्यादिवशी नेमकं काय घडले हे सॅमीला माहिती नाही. या घटनेनंतर पूर्णत: ठीक व्हायला त्याला महिनाभर रुग्णालयात दाखल व्हावे लागले. आता तो ठीक आहे.