शहरं
Join us  
Trending Stories
1
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
2
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
3
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
4
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
5
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
6
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
7
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
8
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
9
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
10
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
11
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर
12
ह्युंदाईच्या या SUV ची किंमत ₹6 लाखही नव्हती, नव्या GST नंतर ₹86156 नं स्वस्त झाली; वरून ₹50000 चा डिस्काउंटही!
13
"क्लेमोर, वायर, पावडर... सगळं तयार होतं !" गुप्त माहितीने गडचिरोली पोलिसांनी रोखला भीषण कट
14
पाक आशिया कप स्पर्धेतून Out? सामान बसमध्ये अन् पाक खेळाडू हॉटेलमध्ये! नेमकं काय घडलं?
15
वाघाला घोरताना कधी पाहिलंय? VIDEO पाहून नेटकरी म्हणतायत, "हे तर आमच्या बाबांसारखेच..."
16
नवरात्रीचा मुहूर्त? पंतप्रधान मोदी नव्या ठिकाणाहून कामकाज पाहणार; PMOचा पत्ता बदलणार
17
प्रसिद्धीचा मुद्दा, अजितदादांचा फडणवीसांकडे रोख;  म्हणाले, “जाहिरात करावी तर देवाभाऊंसारखी”
18
"भेटायला येतो असा मी मित्रासारखा हट्ट केला होता पण...", प्रियाच्या आठवणीत अभिजीत भावुक
19
Video - पैशांचा पाऊस! चालत्या ट्रेनमधून उडवल्या ५०० च्या नोटा; गोळा करण्यासाठी लोकांची झुंबड
20
बच्चू कडूंना कधीच सोडणार नाही म्हणणारे माजी आमदार सोडून गेले; काँग्रेसमध्ये पक्ष प्रवेश

Tokyo Olympic 2021 : हात मिळवण्यावर बंदी, पण स्पर्धकांना वाटले जाणार १५०००० कंडोम

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2021 17:45 IST

Tokyo 2021 : आयोजकांकडून जारी करण्यात आलं एक रूल बुक

ठळक मुद्देआयोजकांकडून जारी करण्यात आलं एक रूल बुकदर चार दिवसांनी केली जाणार खेळाडूंची कोरोना चाचणी

कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर गेल्या वर्षी पार पडणारे ऑलिंपिकचे सामने पुढे ढकलण्यात आले आहेत. २३ जुलै पासून टोकियो ऑलिम्पिकला सुरूवात होणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर या वेळी खबरदारी घेण्यात आली असून एकमेकांशी हात मिळवण्यावर आणि गळाभेट घेण्यावरही बंदी घालण्यात आली आहे. परंतु एक आश्चर्यकारक बाब म्हणजे असे नियम असतानाही आयोजकांकडून मात्र स्पर्धकांना दीड लाख मोफत कंडोम वाटण्यात येणार आहे. जापान टुडेनं दिलेल्या वृत्तानुसार मंगळवारी कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर नियमावली जारी करण्यात आली. यामध्ये यासंदर्भात माहिती देण्यात आली आहे. टोक्यो ऑलिंपिकच्या पार्श्वभूमीवर ३३ पानांचं व्हायरस रूल बुक जारी करण्यात आलं आहे. तसंच यात सांगण्यात आलेले नियम मोडल्यात संबंधित स्पर्धकावर कारवाई करण्यात येणार असून त्यांना खेळातून बाहेरही काढलं जाईल. याव्यतिरिक्त प्रत्येक चार दिवसांनी खेळाडूंची कोरोना चाचणी घेतली जाणार असून ती पॉझिटिव्ह आल्यास त्या स्पर्धकाला यात सहभागी होण्यापासून मनाईदेखील केली जाणार असल्याचं यात नमूद करण्यात आलं आहे. एप्रिल आणि जून महिन्यात या रूल बुकची समीक्षा करण्यात येणार आहे. तसंच आवश्यकता भासल्यास नियमांमध्ये बदलही करण्यात येणार असल्याचं सांगण्यात आलं आहे. ऑलिम्पिकसाठी जपानमध्ये येणाऱ्या खेळाडूंना ७२ तासांच्या आत आपला कोरोना अहवाल द्यावा लागणार आहे. तसंच जपानमध्ये आल्यानंतरही त्यांनी पुन्हा कोरोना चाचणी केली जाईल. परंतु कोणत्याही खेळाडूला क्वारंटाईन होण्याचा नियम लागू राहणार नसल्याचं यात स्पष्ट करण्यात आलं आहे. खेळाडूंना जिम, पर्यटनाच्या जागा, दुकानं, रेस्तराँ या ठिकाणी जाण्यावर बंदी असेल. खेळाडूंना केवळ सामन्यांच्या ठिकाणी आणि काही ठराविक जागीच जाण्याची परवानगी असेल. तसंच त्यांना मास्क परिधान करणंही अनिवार्य असेल. परंतु त्यांना कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण अनिवार्य असणार नसल्याचंही स्पष्ट करण्यात आलं आहे. कोरोना धोका कमी कण्यासाठी खेळाडूंना कमीतकमी वेळ जपानमध्ये ठेवण्यात येईल. जे खेळाडू ऑलिम्पिक व्हिलेजमध्ये राहतील त्यांना फिजिकल कॉन्ट्रॅक्ट सही करावं लागणार नाही. दरम्यान, एएफपीनं दिलेल्या माहितीनुसार खेळाडूंमध्ये दीड लाख कंडोम वाटण्यात येणार असल्याच्या वृत्ताला आयोजकांनी दुजोरा दिला आहे. याव्यतिरिक्त शक्य असल्यास त्यांनी कमी लोकांची भेट घ्यावी असंही आवाहन केलं जाणार असल्याचं आयोजकांनी म्हटलं. 

टॅग्स :Japanजपानcorona virusकोरोना वायरस बातम्याCorona vaccineकोरोनाची लस