शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
2
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
3
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
4
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
5
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
6
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
7
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
8
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
9
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
10
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
11
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
12
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
13
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
14
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
15
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
16
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
17
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
18
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
19
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
20
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
Daily Top 2Weekly Top 5

जि.प.चा टंचाई आराखडा फेटाळला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2020 12:11 IST

जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश; १३ लाखांचाच आराखडा सादर

सुशील देवकर जळगाव : जि.प.ने २०१९-२० साठी केवळ १८ गावांना १८ विशेष नळपाणी योजना दुरूस्ती योजनांची तरतूद असलेला अवघ्या १३ लाखांचा टंचाई आराखडा सादर केल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. हा आराखडा सोमवारीच जिल्हाधिकाऱ्यांनी जि.प. मुख्य कार्यकारी अधिकाºयांकडे परत पाठविला असून संभाव्य टंचाईचा फेरआढावा घेण्याच्या सूचना दिल्या आहेत.दरवर्षी उन्हाळ्यात जाणवणाºया पिण्याच्या पाण्याच्या टंचाईवर मात करण्यासाठी जिल्हापरिषदेकडून संभाव्य टंचाईवरील उपाययोजनांचा आराखडा मागविला जातो. त्यास जिल्हाधिकाºयांकडून मंजुरी देऊन टंचाई विभागाच्या नियंत्रणाखाली या आराखड्याची अंमलबजावणी केली जात असते. मागील वर्षी जिल्ह्यात गत १५ वर्षातील तीव्र दुष्काळ होता. त्यामुळे तब्बल २२१ टँकर द्वारे जिल्ह्यातील टंचाईग्रस्त गावांना पाणीपुरवठा करण्यात आला होता. यंदा झालेल्या अतिवृष्टी व सरासरीपेक्षा दीडपट पावसामुळे टँकरच्या संख्येत घट होणार असल्याचा अंदाज होता. मात्र आराखड्यात टँकरसाठी काहीच तरतूद केलेली नाहीे.फक्त १८ गावांसाठी १८ उपाययोजनाप्रारंभी आराखडा सुमारे २कोटी १२ लाखांचा होता. त्यात २९१ गावांचा समावेश करून सुमारे ३५६ टंचाई उपाययोजना प्रस्तावित केल्या होत्या. मात्र जि.प.ने प्रत्यक्षात जिल्हा प्रशासनाकडे सादर केलेल्या १३ लाख ९० हजारांच्या टंचाई आराखड्यात केवळ अमळनेर व पारोळा या दोन तालुक्यात १८ गावांमधील १८ विशेष नळपाणी योजना दुरुस्तीच्या प्रस्तावांचाच समावेश आहे. त्यात टँकरद्वारे पाणीपुरवठा, विहीर अधिग्रहण,आदी इतर कोणत्याही उपाययोजनांचा समावेश नाही. जिल्ह्णात जरी अतिवृष्टी झालेली असली तरीही अनेक तालुक्यांमधील काही ठरावीक भागात उन्हाळ्यात दरवर्षीच पाणीटंचाई जाणवत असते. मात्र त्याचा अंदाज न घेताच जि.प.ने टंचाई आराखडा सादर केल्याने जिल्हाधिकारी डॉ.अविनाश ढाकणे यांनी हा आराखडा जि.प. मुख्य कार्यकारी अधिकाºयांकडे परत पाठविला आहे.

टॅग्स :Jalgaonजळगाव