शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
5
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
6
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
7
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
8
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
9
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
10
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
11
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
12
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
13
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
14
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
15
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
16
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
17
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
18
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
19
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
20
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
Daily Top 2Weekly Top 5

जळगावात 26 रोजी शून्य सावली दिवस

By admin | Updated: May 22, 2017 15:51 IST

शून्य सावली दिवस जळगावकरांना 26 मे रोजी ही घटना अनुभवता येणार असल्याची माहिती खगोल अभ्यासक अमोघ जोशी यांनी ‘लोकमत’ला दिली.

 जळगाव, दि.22 - सनडायल (सावलीच्या घडय़ाळ) नुसार 12 वाजता व हातातील घडय़ाळानुसार 12 वाजून काही मिनिटांनी सूर्य डोक्यावर येतो आणि आपली सावली पायाजवळ पडते. निसर्गाच्या या अद्भूत घटनेला ‘शून्य सावली दिवस’ किंवा ‘ङिारो श्ॉडो डे’ असे म्हणतात. जळगावकरांना 26 मे रोजी ही घटना अनुभवता येणार असल्याची माहिती खगोल अभ्यासक अमोघ जोशी यांनी ‘लोकमत’ला दिली. 

असे रोज का घडत नाही..
पृथ्वीवर तीन काल्पनिक रेषा आहेत. पृथ्वीच्या मध्य रेषेला विषुववृत्त म्हणतात. या रेषेच्यावर उत्तरेस 23.5 अंशावर असलेल्या रेषेला कर्कवृत्त आणि मध्य रेषेच्या खाली दक्षिणेस 23.5 अंशावर असलेल्या रेषेला मकरवृत्त म्हणतात. 21 मार्च रोजी सूर्य पृथ्वीच्या विषुववृत्तावर असतो. त्यावेळी तो शून्य अंशावर असतो. त्यानंतर तो  उत्तरेकडे सरकायला लागतो. त्याला आपण उत्तरायण म्हणतो. सूर्य +23.5 अंश उत्तरेस जातो. परत फिरून 22 सप्टेंबर रोजी सूर्य विषुववृत्तावर येतो. त्यावेळी सूर्य शून्य अंशावर असतो. त्यानंतर तो दक्षिणेकडे सरकायला लागतो त्याला आपण दक्षिणायन म्हणतो. सूर्य -23.5 अंश दक्षिणेस जातो. हे उत्तरायण व दक्षिणायनच्या काळात घडत असते.
 
सूर्य रोज वेगवेगळ्या अक्षांशावर उगवतो. इंग्रजीत त्याला ‘सन डेक्लीनेशन’ असे म्हणतात. प्रत्येक शहर वेगवेगळ्या अक्षांशावर असते. आपण कर्कवृत्ताच्याजवळ राहतो. जळगाव 21.0 अंश उत्तर या अक्षांशावर आहे. 21 मार्च ते 21 जून या काळात 26 मे रोजी सूर्याचे डेक्लीनेशन जळगावच्या अक्षांशाइतके असते. म्हणून त्यादिवशी आपल्या शहरात 12 वाजून 25 मिनिटांनी ‘ङिारो श्ॉडो डे’ असतो. 
21 जूननंतर परतीच्या प्रवासात 18 जुलैला सूर्याचे डेक्लीनेशन परत आपल्या अक्षांशाइतके असते त्यावेळी दुस:यांदा आपल्याकडे ‘ङिारो श्ॉडो डे’ असतो. अशा पद्धतीने वर्षातून दोन वेळा सूर्य 12 वाजून 25 मिनिटांनी आपल्या डोक्यावर येतो.
काही शहरांमधील शून्य सावलीचे दिवस आणि वेळ
सांगली- 7 मे, (12.30 मि.), लातूर- 13 मे (12.20 मि.), पुणे- 13 मे (12.31 मि.), मुंबई- 15 मे (12.35 मि.), नाशिक- 20 मे (12.31 मि.), अमरावती- 25 मे (12.16 मि.), जळगाव- 26 मे (12.25 मि.)
 
खगोलप्रेमींना संधी
या भौगोलिक घटना प्रात्यक्षिकद्वारे आपण समजून घेऊ शकतो. हे प्रात्यक्षिक  7/1, महाबळ कॉलनी, जळगाव येथे केले जाणार आहे. हा एक वेगळा अनुभव आहे, खगोलप्रेमींनी लाभ घ्यावा, असे आवाहन संयोजकांनी केले आहे.