जळगाव : सोमवारपासून सुरु होणाऱ्या गणेशोत्सवानिमित्त बाजारपेठ फुलली असून विविध फुलांनी, फळांनी आणि सजावटीच्या साहित्यासह गणेशमूर्ती स्टॉल्सवर भक्तगणांनी रविवारी एकच गर्दी केली होती. या महाउत्सवाच्या पार्श्वभूमीवर झेंडूने १५० रुपयांचा दर गाठला आहे तर नारळानेही पंचविशी गाठली आहे.गणेशोत्सवात फळे, फुले, सजावटीचे आणि पुजेचे साहित्य, प्रसाद यांना मोठी मागणी असते. त्यामुळे शहरातील एम. जी. रोड, फुले मार्केट, गोलाणी मार्केट, एम. जी. रोड आदी ंिठकाणी फळ, फुले विक्रेत्यांचे अनेक स्टॉल मांडण्यात आलेआहेत.गणेशोत्सवामुळे फुलांना मोठी मागणी असून त्यामुळे फुलांचे दर वधारले आहेत. पिवळ्या झेंडूने शंभरी तर भगव्या झेंडूने १५० रुपयांचा पल्ला गाठला आहे. नारळानेही गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पन्नाशी गाठली आहे. पूजेसाठी लागणारी पाच फळे वीस रुपयांत तर गुलाल हा विड्यासाठी लागणारी पाने ही दीडशे रुपये शेकडा या दराने विकली जात आहेत. महानैवेद्यासाठी लागणारी केळीची पाने २० रुपयांना पाच याप्रमाणे विकली जातआहेत.यंदा थर्माकोलवर बंदी असताना काही ठिकाणी थर्माकोलची विक्री सुरु होती. मात्र यंदा इको फ्रेंडली मखरांवरच विक्रेत्यांनी भर दिल्याचे दिसून येत होते. विविध आकारातील मखरंउपलब्ध होती. १५० रुपयांपासून ३०० ते ४०० रुपये या दरात छोट्या मूर्तीसाठीची इको फ्रेंडली मखर उपलब्ध आहेत. मात्र मोठ्या मूर्तीसाठीचे मखर साडेतीन हजार रूपयांपर्यंत उपलब्ध होती. अगरबत्ती १० रुपयांपासून ते १५० रुपयांपर्यंत विविध पॅकेजमध्ये बाजारपेठेत उपलब्ध आहेत. जास्त लांबीच्या आणि पाच ते सात तास सुगंध देणाºया अगरबत्त्या ८० रुपये प्रति पॅक यादराने विकली जात आहेत. बाजारपेठेत खरेदीसाठी रविवार असूनही दिवसभर भक्तगणांची मोठी गर्दी झालीहोती.फुलांचे दर-गुलाब-५०० रुपये शेकडा-पिवळा झेंडू-१०० रुपये किलो-भगवा झेंडू-१५० रुपये किलो-हार - ७० रूपयांपासून-दुर्वा- ५ रुपये जुडी-लिलीचे बंडल-५० रुपये(४५ फुलांचे)
झेंडू १५० रूपये, नारळाची पंचविशी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2019 12:44 IST