शहरं
Join us  
Trending Stories
1
'केवळ एका फोन कॉलने इराण-इस्रायल युद्ध थांबवता येऊ शकतं..."; परराष्ट्र मंत्री अराघची यांचा दावा
2
"इराणच्या अयातुल्ला खामेनींना संपवल्यानंतरच हा संघर्ष थांबेल"; बेंजामिन नेतन्याहूंचे मोठे विधान
3
क्रिकेटच्या इतिहासात असं पहिल्यांदाच घडलं, सलग तीन वेळा टाय झाला टी-२० सामना, अखेर असा लागला निकाल
4
तुमच्या नोकरीवर टांगती तलवार? मे महिन्यात बेरोजगारीचा दर वाढला, 'या' लोकांना सर्वाधिक फटका
5
"ट्रम्प यांचं वर्तन अनिश्चित, ट्रेड तेव्हाच जेव्हा टॅरिफबाबत..," भारतानं अमेरिकेसमोर ठेवली मोठी अट
6
Sheetal Chaudhary: बॉयफ्रेंडनेच केली शीतलची हत्या! अपघाताचा बनाव, पण सुनील अडकला; हत्येचे कारण अखेर समोर   
7
Israel-Iran War: संरक्षणावर किती खर्च करतात इराण आणि इस्रायल? कोणत्या सैन्याची ताकद आहे जास्त
8
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
9
Thane: ट्रेकिंगला गेले असता पाय घसरुन दरीत कोसळला, ठाण्यातील धक्कादायक प्रकार!
10
"सगळे या..सगळे या...", मराठीत बोलून के-पॉप स्टार जॅक्सन वांगनं सर्वांना केलं थक्क, व्हिडीओ होतोय व्हायरल
11
"थोडी माणुसकी दाखवा"; अपघातानंतर रडत व्यथा मांडणाऱ्या डॉक्टरचा नवा व्हिडीओ समोर; म्हणाला, "मी खूप बोलून गेलो..."
12
Plane Crash: बोइंग विमानाचे 'दिवसच खराब'... अहमदाबाद अपघातानंतर आणखी ४ विमानांचे 'इमर्जन्सी लँडिंग'
13
लेख: आता सीरियाचं 'लक्ष' महिलांच्या कपड्यांवर
14
प्रवाशांना मार्गदर्शक सूचना द्या, रेल्वे नोडल अधिकारी नेमा, यंत्रणांना निर्देश
15
आजचा अग्रलेख: मारेकऱ्यांच्या मुसक्या आवळा!
16
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
17
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
18
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
19
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
20
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!

यावल तालुक्यातील कोळवद येथे विहिरीत पडून युवकाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 10, 2018 01:12 IST

यावल तालुक्यातील कोळवद येथे एका ३५ वर्षीय तरुणाचा विहिरीत पडून दुर्दैवी मृत्यू झाला. मयताचे नाव भूषण डोंगर फेगडे (रा.सातोद, ता.यावल) असे आहे. ही घटना रविवारी सकाळी ११ वाजेच्या सुमारास घडली.

ठळक मुद्देविहिरीत डोकावताना तोल गेल्याने पडून घडली दुर्घटनाविहिरीत होते खूप पाणी, दोन तासांनंतर आढळला मृतदेह

यावल, जि.जळगाव : तालुक्यातील कोळवद येथे एका ३५ वर्षीय तरुणाचा विहिरीत पडून दुर्दैवी मृत्यू झाला. मयताचे नाव भूषण डोंगर फेगडे (रा.सातोद, ता.यावल) असे आहे. ही घटना रविवारी सकाळी ११ वाजेच्या सुमारास घडली.कोळवद गावातील शेतकरी मिठाराम कृष्णा जावळे यांचे कोळवद शिवारातच शेत गट क्रमांंक ३५२ आहे. त्या शेतात विहीर आहे. गुरुवारी सकाळी ११ वाजेच्या सुमारास या शेतात सातोद, ता.यावल येथील रहिवासी भूषण डोंगर फेगडे हा तरूण हा गेला होता. तो विहिरीत डोकावत असताना अचानक त्याचा तोल गेला व तो विहिरीत पडून बुडून मरण पावला. घटनेची माहिती मिळताच गावातील नागरीकांनी तेथे धाव घेतली तर विहिरीत खूप पाणी असल्याने दोन तासांनंतर फेगडेचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. याबाबत कोळवद पोलीस पाटील दीपक पाटील यांनी यावल पोलिसांना माहिती दिली. त्यावरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. वैद्यकीय अधिकारी डॉ.दिनेश खेताळे यांनी ग्रामीण रूग्णालयात शवविच्छेदन केले. फेगडे यांच्यावर सोमवारी सकाळी ९ वाजेला अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. त्यांच्या पश्चात आई, वडील, भाऊ, पत्नी, मुलगा, मुलगी असा परिवार आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीYawalयावल