शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

युवकांनी कमविले, प्रशासनाने गमविले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 7, 2018 19:22 IST

देशभरातील सैन्य भरतींचे रेकार्ड जळगावने तोडले

सचिन देवजळगाव : जळगाव येथे झालेल्या सैन्य भरतीसाठी तब्बल ६८ हजार मुलांनी हजेरी लावल्याने, देशभरातील सैन्य भरतींचे रेकार्ड जळगावने तोडले आहेत. एकीकडे युवकांनी जळगावचे नाव कमविले असताना, दुसरीकडे जिल्हा प्रशासनाने भरतीसाठी आलेल्या युवकांची सोय न केल्याने, नाव गमविले आहे.या भरतीसाठी विविध जिल्ह्यांमधुन दररोज ५ ते ६ हजार युवक जळगावला येत असतांना, जिल्हा प्रशासनाने भरतीच्या ठिकाणापासुन तीन किलो मीटर अंतरावर असलेल्या सैनिकी हॉलमध्ये निवाऱ्याची व्यवस्था केली. मात्र, या ठिकाणी जाण्यासाठीच २० रुपये लागत असल्याने, बहुतांश तरुणांनी याकडे पाठ फिरवली होती. तर शिवतीर्थ निवाºयाच्या नावाखाली फक्त मंडप उभारला होता. या ठिकाणी शौचालयाची ना लाईटची व्यवस्था असल्यामुळे, तरुणांचे मोठ्या प्रमाणावर हाल झाले. कुठल्याही ठिकाणी फिरते शौचालय नसल्याने, तरुणांना बस स्टॅण्ड व रेल्वे स्टेशनचा आश्रय घ्यावा लागला.शिवतीर्थ मैदानावर झोपण्यासाठी उघड्यावरच मंडप उभारला असल्याने, तरुणांनी या ठिकाणी न झोपता परिसरातील व्यापारी संकुलाचे ओटे, बस स्टॅण्ड, गांधी उद्यानाचे फुटपाथ तर काही युवकांनी रस्त्यावर झोपुनही रात्र काढली. परभणी, नांदेड,औरंगाबाद, नंदुरबार या भागातुन आलेल्या हजारो युवकासांठी मनपा ना जिल्हा प्रशासनाने शौचालयाचीदेखील व्यवस्था न केल्याने, तरुणांनी प्रशासनाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली. मुलांच्या सुविधेबाबात एकमेकांकडे बोट दाखवुन अधिकाºयांनी वेळ मारुन नेली. मात्र, कुठल्याही अधिकाºयाने पुढे येऊन, मुलांच्या गैरसोयीबद्दल मुलांशी चर्चादेखील केली नाही.युवकांचे निवाºयासोबत खाण्या-पिण्याचेही हाल झाले. शहरात ढीगभर सामाजिक संस्था असताना कुठल्याही संस्थेने अन्नादानाची सुविधा केली नाही. यामुळे बाहेरुन आलेल्या हजारो युवकांना दुप्पटचे पैसे मोजुन पोटाची भूख भागवावी लागली. बस स्टॅण्डसमोरील व्यावसायिकांनी तर अक्षरश: युवकांना लुटण्याचे धंदे केले. यामुळे बेरोजगार तरुणांच्या खिशांना चांगलीच झळ बसली.एकंदरीत पाहता भरतीसाठी आलेल्या तरुणासांठी जिल्हा प्रशासनाने कुठलिही सुविधा न केल्यामुळे तरुणांनी प्रशासनाविरोधात तीव्र संपातदेखील व्यक्त केला. शौचालय नसल्याने उघड्यावरच प्रात:विधी करावा लागला. यामुळे क्रीडा संकुल, शिवतीर्थ मैदान या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर दुर्गंधी पसरली होती. यामुळे याचा परिणाम जळगावकरांच्या आरोग्यावरदेखील झाला. प्रशासनाच्या नियोजनशून्य कारभारामुळे जळगावकरांनीदेखील तीव्र नाराजी व्यक्त केली. भरतीसाठी आलेल्या उच्चशिक्षित तरुणांनी, त्यांना झालेल्या त्रासाबद्दल प्रशासनाविरोधात नाराजी व्यक्त केल्याने, प्रशासनाने आपले नाव गमविले आहे. असे म्हटल्यास काही वावगे ठरणार नाही.

टॅग्स :Jalgaonजळगाव