वरणगाव, ता.भुसावळ, जि.जळगाव : शहरातील भंगाळे वाड्यातील तरुणाने आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी सकाळी दहा वाजेच्या सुमारास उघडकीस आली. योगेश सतीश भंगाळे (वय ३०) असे या तरुणाचे नाव आहे.घरात कोणी नसताना आपल्या राहत्या घराच्या दुसºया मजल्याच्या खोलीत नॉयलॉनचा दोर छताला बांधून गळफास घेतला.योगेशचा साखरपुडा ५ मे रोजी झालेला होता. आज १० मे रोजी सकाळी लग्नाचा बस्ता काढण्याचे ठरले होते. ही लगबग सुरू असतानाच त्याने आत्महत्या केल्याचे निदर्शनास आले. योगेश हा शस्त्रनिर्मिती कारखान्यात ठेकदाराकडे कामालक होता.याबाबत किशोर भंगाळे यांनी वरणगाव पोलिसांना माहिती दिली. त्यावरून त्यावरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. हवालदार सुनील वाणी तपास करीत आहे.कुटुंबातील एकुलता एक मुलगा गेल्याने हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. त्याच्या पश्चात आई-वडील, तीन बहिणी आहेत.
वरणगावात तरुणाची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2019 19:40 IST
वरणगाव शहरातील भंगाळे वाड्यातील तरुणाने आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी सकाळी दहा वाजेच्या सुमारास उघडकीस आली. योगेश सतीश भंगाळे (वय ३०) असे या तरुणाचे नाव आहे.
वरणगावात तरुणाची आत्महत्या
ठळक मुद्देगेल्या आठवड्यात झाला होता साखरपुडाआज काढण्यात येणार होता लग्नाचा बस्ताघरात कोणी नसताना दुसऱ्या मजल्यावर घेतला गळफासकुटुंबातील एकुलता एक मुलगा गेल्याने हळहळ