आॅनलाईन लोकमतभुसावळ,दि.२६ : कर्जबाजारी शेतकरी वडील आणि वयात येऊन सुद्धा लग्न होत नसल्याच्या नैराश्यातून शंकर वसंत कोळी (वय २५) या तरुणाने विष प्राशन करून आत्महत्या केली. ही घटना २५ एप्रिल रोजी भुसावळ तालुक्यातील मोंढाळा येथे सकाळी उघडकीस आली.याबाबत भुसावळ तालुका पोलिसांनी दिलेली माहिती अशी की मोंढाळे येथील शंकर वसंत कोळी (वय २५) याचे वडील वसंत कोळी शेतकरी आहेत. त्यांच्यावर कर्जाचा डोंगर आहे. शिवाय सोबतच्या मित्रांचे लग्न झाले, माझे लग्न होत नाही. कोणतेही काम मिळत नाही. नोकरी मिळत नाही या नैराश्येतून त्याने आत्महत्या केली.२४ एप्रिल रोजी सकाळी अमोदा ता.यावल येथे मित्रांसोबत लग्नाला गेला होता. तेथून घरी आलाच नाही. दुसऱ्या दिवशी २५ रोजी सकाळी शंकर कोळी यांच्या शेतात सचिन चौधरी हे ट्रॅक्टर घेऊन नांगरणीसाठी गेले असता शंकर हा सरपंच जगन्नाथ कोळी यांच्या शेताच्या बांधावर मृताअवस्थेत आढळून आला. शंकरच्या पश्चात अपंग भाऊ, दोन बहिणी असा परिवार आहे. वरणगाव येथील ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. शोकाकूल वातावरणात अंतिम संस्कार करण्यात आले. नैराश्येतून झालेल्या आत्महत्येने मोंढाळे गाव सुन्न झाले आहे. या बाबत तालुका पोलीस ठाण्यात अनिल लक्ष्मण कोळी यांच्या खबरीवरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
मोंढाळा येथे लग्न होत नसल्याने तरुणाची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2018 19:30 IST
कर्जबाजारी शेतकरी वडील आणि वयात येऊन सुद्धा लग्न होत नसल्याच्या नैराश्यातून शंकर वसंत कोळी (वय २५) या तरुणाने विष प्राशन करून आत्महत्या केली.
मोंढाळा येथे लग्न होत नसल्याने तरुणाची आत्महत्या
ठळक मुद्देवडिल कर्जबाजारी आणि लग्न होत नसल्याच्या नैराश्यातून उचलेले आत्महत्येचे पाऊलमयत तरुण मित्रांसोबत गेला होता लग्नालाशेताच्या बांधावर आढळून आला मृतदेह