शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
2
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
3
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
4
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
5
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
8
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
9
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
10
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
11
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
12
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
13
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
14
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
15
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
16
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
17
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
18
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
19
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
20
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

बोली भाषा जतन करणे आपले काम - प्रा.डॉ. केशव देशमुख

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2019 00:38 IST

सामान्य जन बोलतात तोपर्यंत मराठी आबाधित राहिल

जळगाव - मराठीचे दिवस वाईट नाहीत, जोपर्यंत सामान्य लोक ती बोलत आहेत, त्यांची जीभ शाबूत आहे. तोपर्यंत मराठी अबाधित राहिल, यासाठी आपली बोली भाषा जतन करणे आणि तिचे संवर्धन करणे सर्वांचीच जबाबदारी आहे, असे मत राज्याच्या भाषा सल्लागार समितीचे सदस्य प्रा.डॉ. केशव देशमुख (नांदेड) यांनी व्यक्त केले.चोपडा येथील कवी राजेंद्र पारे यांच्या पुस्तक प्रकाशनासाठी ते जळगावात आले होते. त्यावेळी त्यांनी लोकमतशी संवाद साधला.प्रा. देशमुख हे स्वामी रामानंद तीर्थ मराठावाडा विद्यापीठात मानव विज्ञान शाखेचे डीन आहेत. त्यांनी लिहिलेल्या साहित्याला अनेक पुरस्कार मिळाले आहेत.प्रश्न- भाषा सल्लागार समिती काम काय आहे?उत्तर- विविध प्रकारचे कोष निर्माण करणे. याशिवाय मराठी भाषेचा प्रचार आणि प्रसार आणि अमराठी वर्गापर्यंत मराठी भाषा घेऊन जाणे हा भाषा सल्लागार समितीचा उद्देश आहे. यासाठी काही दिवसापूर्वीच या समितीची पहिली बैठक झाली आहे.प्रश्न- मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा, यासाठी काय प्रयत्न सुरु आहेत?उत्तर- मूळत: आपल्याकडे विविध बोली भाषा बोलल्या जातात. कथा, कादंबरी, कविता ह्या आता बोलीभाषेत येत आहेत. बोली भाषा जतन करणे हा या समितीचा मूळ उद्देश आहे आणि ती टिकवणे आपले काम आहे.प्रश्न- एकीकडे मराठीबद्दल आस्था दाखवायची आणि आपल्या मुुलांना मात्र इंग्रजी शाळेत टाकायचे? असे सुरु आहे....त्याबद्दल?उत्तर - मूळात इंग्रजीशी वैर असण्याचे कारण नाही. मराठी जशी ज्ञानाची भाषा आहे तशी इंग्रजीही आहे . इंग्रजीही जगाला जोडणारी भाषा आहे. मराठी आपली मातृभाषा आहे. ती जतन करणे आणि सांभाळणे आपल्या हाती आहे. यासाठी भाषा सल्लागार समितीच्या माध्यमातून उपयोजित मराठी पुढे यावी, यसाठी प्रयत्न केले जात आहेत.

टॅग्स :Jalgaonजळगाव