शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांच्या 50 टक्के टॅरिफला भारतानं का दिलं नाही उत्तर? राजनाथ सिंह यांचा परदेशातून मोठा खुलासा!
2
"ED, EVM, भौकने वाले..., फौज तेरी भारी है; जंजीरों में जकड़ा हुआ जयंत पाटील..." पडळकरांच्या वक्तव्यावरून अमोल कोल्हेंचा हल्लाबोल
3
'सुप्रीम कोर्ट आता बेल कोर्ट बनलं आहे'; जामीन अर्जांची संख्या पाहून न्यायमूर्ती नागरत्ना यांनी व्यक्त केली चिंता
4
"२० ओव्हर्स टिकणार त्या दिवशी २०० धावा ठोकणार"; अभिषेक शर्मासंदर्भात मोठी भविष्यवाणी
5
"सनातनी हज यात्रेला जात नाहीत, त्यांच्या लोकांनीही...; गरबा मंडपाच्या दरवाजावर गोमूत्र ठेवा!"; धीरेंद्र शास्त्री यांचा सल्ला
6
बाई, काय हा प्रकार! पाकिस्तान बेक्कार हरला, तरीही हॅरिस रौफच्या बायकोने केली 'तशी' पोस्ट
7
उद्धवसेनेच्या दसऱ्या मेळाव्याला राज ठाकरे जाणार? टिझरने वेधले लक्ष, मिळाले सूचक संकेत!
8
'Before आणि After चा बोर्ड पाहून आनंद झाला', GST 2.0 बाबत PM मोदींचे देशाच्या नावे पत्र
9
India vs West Indies Test Series: गिलच्या संघातून रिषभ पंत 'आउट'; कोण घेणार त्याची जागा?
10
IND vs PAK: "तुम्ही जर पातळी सोडून वागायला लागलात तर बॅटने..."; इरफानने पाकिस्तानला सुनावलं
11
'पोलीस बाजूला ठेवा, दम असेल तर एकदा रणांगणात या'; निलेश लंकेंचा गोपीचंद पडळकरांना जाहीर इशारा
12
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
13
'बेनिफिट ऑफ डाउट' मिळाला असता तर आम्ही जिंकलो असतो; 'त्या' निर्णयावर अख्तरची 'बोलंदाजी'
14
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
15
१५ दिवसात भाजपच्या दुसऱ्या नगरसेवकाला अटक; टोळीला हाताशी धरुन केला गोळीबार, पैसेही पुरवले
16
मुक्या जीवाचे हाल! गायीच्या डोळ्यांवर पट्टी बांधली, फेकलं नाल्यात; काळजात चर्र करणारी घटना
17
भारताकडून हरल्यावर पाकिस्तानचा रडीचा डाव, या गोष्टीवरून पुन्हा ICCकडे केली तक्रार  
18
शेअर असावा तर असा...! सरकारची एक घोषणा अन् थेट ₹4000 नं वाढला; एकाच दिवसात केली कमाल, गुंतवणूकदारांना केलं मालामाल!
19
Video: रस्त्यात खड्डे की, खड्ड्यात रस्ते..? 5 प्रवाशांना घेऊन Scorpio-N अख्खी बुडाली...
20
गौतम अदानींची 'पॉवर'फुल कामगिरी; अवघ्या 2 दिवसांत केली 1.7 लाख कोटींची कमाई

तुझ्या पायाची चाहूल लागे पानापानामधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2019 13:09 IST

श्रावण म्हणजे व्रत वैकल्पे, श्रावण म्हणजे उपवास -तपास

श्रावण महिना म्हणजे आनंद, उत्साहाची पर्वणीच ! श्रावण म्हणजे हिरवाईच्या वैभवाची लयलूट, श्रावण म्हणजे व्रत वैकल्पे, श्रावण म्हणजे उपवास -तपास, श्रावण म्हणजे धार्मिक ग्रंथाचे श्रवण, श्रावण म्हणजे सणावारांची पुण्यपर्वणी, श्रावण म्हणजे वर्षा सहलींची मेजवानी ! धार्मिक, सांस्कृतिक आणि अध्यात्मिक दृष्टीने तसेच वैज्ञानिक अंगानेही श्रावण हा बारा महिन्यातला अत्यंत महत्वाचा महिना आहे. भगवंताचे खरे दर्शन आपल्याला श्रावणातच होते. म्हणूनच कवयित्री बहिणाबाई सांगतात,‘तुझ्या पायाची चाहुल लागे पानापानामधी ।देवा तुझं येनं जानं वारा संगे कानामधी ।।हिरवकंच वस्त्र लेवून, हिरवा चुडा घालून, हिरवा शालू पांघरून हिरवाईने मंडित झालेली सृष्टी देवता या वैभवाचं दान देणाऱ्या विधात्याच्या स्वागताला या श्रावण महिन्यातच सज्ज झालेली दिसते.या ओळीतून बालकवींनी श्रावणाचे दृश्य रूप आपल्यासमोर उभे केले आहे. ‘श्रावणात घननिळा पासून’, रिमझिम के गीत सावन गाये ’ पर्यंत अनेक कवी व गीतकारांनी श्रावणाचं हे वैभव आपापल्या पद्धतीने वर्णन केलं आहे. प्रेमिकांना श्रावण प्रेमाची महती सांगतो. धार्मिकांना धर्मपारायण करतो, उपासकांना उपासनेचा संदेश देतो. तर कलावंतांच्या प्रतिभेला नवोन्मेषाचे धुमारे फुलवितो. प्रत्येकजण श्रावणाकडे आपल्या नजरेने पाहातो. आपल्या दृष्टीने श्रावणाचे चित्र रेखाटतो, श्रावणाचे गीत गातो. भगवान श्रीकृष्ण कंसाच्या दरबारात जातांना मथुरेतील लोकांनी त्यांचे प्रथम दर्शन घेतले तेव्हा मल्लांना तो मलू वाटला, वृद्धांचा वात्सल्यभाव जागा झाला, तरूणींना त्याचा रूपात मदनाचे रूप दिसले, तर बालकांना तो सवंगडी वाटला तसेच श्रावण महिन्याचे आहे. प्रत्येकाला तो वेगळा वाटत असला तरी श्रावण हा उत्साहाचा आणि उत्सवाचा महिना आहे हे मात्र खरं !- प्रा. सी.एस.पाटील. धरणगाव.

टॅग्स :Adhyatmikआध्यात्मिकJalgaonजळगाव