शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
3
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
4
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
5
बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
6
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
7
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
8
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
9
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
10
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
11
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
12
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
13
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
14
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
15
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
16
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
17
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
18
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
19
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
20
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
Daily Top 2Weekly Top 5

रामदेववाडी तलावात बुडूत तरुणाचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 24, 2020 13:26 IST

महापालिकेचे पथक त्याशिवाय रामदेववाडी, शिरसोली, पाथरी, म्हसावद व गालापुर येथील पट्टीच्या पोहणा-यांना पाचारण करण्यात आले होते.

जळगाव : तलावात आंघोळीसाठी गेलेल्या चेतन साहेबराव राठोड (१८) या तरुणाचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना रामदेववाडी, ता.जळगाव येथे घडली आहे. हा तरुण शनिवारी बुडाला होता. रविवारी सकाळी ७ वाजता त्याचा मृतदेह सापडला. त्याच्या शोधण्यासाठी महापालिकेचे पथक त्याशिवाय रामदेववाडी, शिरसोली, पाथरी, म्हसावद व गालापुर येथील पट्टीच्या पोहणा-यांना पाचारण करण्यात आले होते.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, रामदेववाडी येथे चार दिवसापासून नळांना पाणी येत नसल्याने गावातील तरुण तलावात आंघोळीसाठी जातात. शनिवारी चेतन, नवल पांडूरंग राठोड व सागर धनराज राठोड असे तिघं जण तलावात आंघोळीसाठी गेले. चेतन याला पोहता येत नसल्याने तो खोल खड्ड्यात गेला अन् जीव वाचविण्यासाठी आरडाओरड करायला लागला. हा प्रकार पाहून सागर व नवल दोघं जण मदतीला धावले, त्याशिवाय तलावाच्या दुस-या काठावर मासेमारी करीत असलेलेल हौसीलाल भोई हे देखील धावून आले. मात्र तलाव खोल व गाळ खूप प्रमाणात असल्याने चेतन हाती लागला नाही. त्यांनी हा प्रकार लागलीच गावात कळविला.चेतन पाण्यात बुडाल्याची माहिती रामदेववाडी व वावडदा गावात पसरल्यानंतर गावक-यांनी धाव घेऊन तलावात शोध कार्य राबविले. रविवारी सकाळी चेतनचे नातेवाईक नानाभाऊ जेरी चव्हाण (रा.तळवण तांडा, ता.भडगाव) यांनी परत तलावात उडी घेऊन शोध मोहीम राबविली असता सात वाजता चेतनचे डोक त्यांच्या हाताला लागले. याप्रकरणी एमआयडीसी पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. चेतन याच्या पश्चात वडील साहेबराव हरी राठोड, आई द्वारकाबाई व लहान भाऊ नितीन  बहिण चैताली समाधान चव्हाण विवाहित आहे. चेतनच्या मृत्यूने कुटुंबावर मोठे संकट ओढवले आहे. रवींद्र पाटील व म्हसावदचे पोलीस कर्मचारी सचिन देशमुख यांना सकाळी मृतदेह जिल्हा रुग्णालयात आणला. उपनिरीक्षक विशाल वाठोरे, सचिन मुंडे यांनी पंचनामा केला. शवविच्छेदन झाल्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला.