पाळधी, ता. जामनेर : येथून जवळच असलेल्या नाचनखेडा येथील तरुण नौमन पटेल (वय२४ वर्ष) याचा वाघूर नदीत बुडून मृत्यू झाला. ही दुर्घटना मंगळवारी दुपारी घडली.नौैमन हा वाघूर नदीकाठी मित्र परिवारासह फिरण्यासाठी गेला होता. वाघूर नदी पूलाजवळील जुन्या बांधाजवळ पोहत असतांना नदी पात्राचा अंदाज न आल्याने बुडून त्याचा मृत्यू झाला. सोबतच्या मित्रांनी वाचविण्याचे प्रयत्नासाठी आरडाओरडा केला असता आजूबाजूचे शेतातील लोक जमा झाले व त्यानंतर नौमन यास बाहेर काढले. दुपारी ४ च्या दरम्यान पाळधी येथील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी त्यास दाखल केले असता डॉक्टरांनी त्यास मृत घोषित केले.नौमन पटेल हा त्याच्या मावशी कडे रहात होता त्याची मावशी ही नाचनखेडा येथे शिक्षिका आहे व त्याचे आई वडील हे मुंबई येथे राहतात. नौमन हा जळगाव येथील गुलाबराव देवकर इंजिनिअरिंग कॉलेज मध्ये शिक्षण घेत होता. तो नाचनखेडा येथील माजी सरपंच शोएब पटेल यांचा भाचा आहेया घटनेबद्दल नाचखेडा गावात व परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.