शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

रेल्वेसमोर स्वत:ला झोकून देत तरूणाची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 29, 2020 12:25 IST

फोटोवरून पटली ओळख

जळगाव : रिंगणगाव (ता़ एरंडोल) येथील गजानन सुकलाल महाजन (३५) या तरूणाने गितांजली एक्सप्रेस समोर स्वत: ला झोकून देत आत्महत्या केल्याची घटना पिंप्राळा रस्त्यावरील बजरंग बोगद्यावरील रेल्वे रुळावर घडली़ याप्रकरणी लोहमार्ग पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे़ त्याच्या आत्महत्येचे कारण समजून आलेले नाही़गजानन महाजन हा आई-वडील पत्नी व मुलासह रिंगणगाव येथे वास्तव्यास होता़ बांभोरी गावाजळील खुबचंद सागरमल पेट्रोल पंपाजवळ पंक्चरचे दुकान लावून घराचा उदरनिर्वाह करीत होता़ शुक्रवारी सकाळी दुकानावरील सहकार्याला मी चारचाकीचा लिलाव आहे तेथे जावून येतो, तोपर्यंत दुकान उघड असे सांगितले़त्यानंतर गजानन हा दुकानावर आला नाही़ त्यातच बजरंग बोगद्यावरील शिरसोलीकडे जाणाऱ्या रेल्वे रुळावरील खांबा क्रमांक ४१८/१ जवळ धावत्या गितांजली एक्सप्रेस समोर त्याने स्वत:ला झाकून देत आत्महत्या केली़जिल्हा रूग्णालयात नातेवाईकांची गर्दीशवविच्छेदनासाठी मृतदेह जिल्हा रूग्णालयात नेण्यात आले़ त्यावेळी पोलिसांकडून पंचनामा करण्यात आला़ दरम्यान, घटनेची माहिती मिळताच नातेवाईकांनी जिल्हा रूग्णालयात एकच गर्दी केली होती़ सायंकाळी शवविच्छेदन झाल्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला़ याप्रकरणी लोहमार्ग पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे़वाहतुकीची कोंडीअपघातस्थळी बघ्यांची मोठ्या प्रमाणावर गर्दी जमली होती. त्यामुळे पिंप्राळा रस्त्यावर दुतर्फा वाहनांच्या रांगा लागून वाहतुकीची कोंडी झाली होती. काही वेळाने वाहतूक सुरळीत करण्यात आली.फोटोवर लिहीले होते नावगजानन याने आत्महत्या केल्यानंतर रेल्वे रूळाजवळ बघ्यांची प्रचंड गर्दी जमली़ त्यातील एका नागरिकाने घटनेची माहिती लोहमार्ग पोलिसांना दिली़ त्यानुसार अनिंद्र नगराळे व इतर पोलीस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेवून आत्महत्या केलेल्या तरूणाची अंगझडती घेतली़ त्यात त्यांना फोटो व त्यावर गजानन महाजन लिहिलेले आढळून आले़ त्याच दरम्यान, एकाने तो फोटो ओळखला व गजानन याची ओळख पटली.

टॅग्स :Jalgaonजळगाव