वासेफ पटेलभुसावळ, जि.जळगाव : भारतीय रेल्वेमध्ये प्रवास करत असताना अनेक वेळा डब्यावरील निळ्या-पिवळ्या आडव्या रेषेचा अर्थ काय होतो याची अनेकांना माहिती नसते. निळ्या कोचवर पिवळे-पांढरे पट्टे म्हणजे तो जनरल डबा होय. हाच जनरल डबा शोधण्यासाठी अनेक वेळा नवख्या रेल्वे प्रवाशांची धावपळ होताना दिसते.काळासोबत रेल्वेत खूप बदल झाले आहेत. १९५१ मध्ये भारतीय रेल्वेचे राष्ट्रीयकरण झाले. १६ एप्रिल १८५३ रोजी रेल्वेने देशात सेवा सुरू केली. पहिली ट्रेन मुंबईहून ठाणे स्टेशनला गेली. पहिल्या रेल्वेचा हा ३३ किलोमीटरचा प्रवास होता.तेव्हापासून ते आता रेल्वेच्या कामकाजाची व्यवस्था, सुविधा यामध्ये अनेक बदल करण्यात आले आहेत. रेल्वे कोचचे रंगही बदलण्यात आले. त्यांच्यावर असे बरेच साइन कोड आहेत. जे साईन कोड आपण पाहतो पण त्यांचा अर्थ फारच कमी प्रमाणात जाणतो.रेल्वे कोचच्या शेवटी पिवळे, निळे, लाल इत्यादी पट्टे असतात. परंतु याचा नेमका अर्थ काय हे अनेकांना माहिती नसते.निळ्या कोचवर पिवळे पट्टे खिडकीच्या वरच्या बाजूला असतात. निळ्या कोचला पिवळे किंवा पांढऱ्या रंगाचे पट्टे असतात. खरं तर हे पट्टे हा कोच दुसरा वर्ग म्हणजेच जनरल कोच आहे. या गोष्टीचे सूचक आहेत.हे पट्टे केवळ प्रवाशांच्या सोयीसाठी बनवले गेले आहे. उदाहरणार्थ एखादी रेल्वे जेव्हा स्टेशनवर येते तेव्हा गर्दीतील बरेच लोक सामान्य कोच शोधतात. अशा परिस्थितीत दुरून नजरेस येणारे हे पट्टे पाहिले जाऊ शकतील. निळ्या कोचवर जाड पिवळे पट्टे- जर निळ्या किंवा लाल रंगाच्या कोचवर जाड पिवळे पट्टे असतील तर याचा अर्थ असा आहे की कोच अपंग आणि आजारी लोकांसाठी आहे.लोकल ट्रेनमध्ये ग्रे रंगावर लाल रंगाच्या रेषा दर्शवितात की कोच फर्स्ट क्लास तिकीट खरेदीदारांसाठी आहे. मुंबई पश्चिम रेल्वेमध्ये काही कोचना राखाडीपेक्षा हिरवे पट्टे असतात, ते महिला कोचचे सूचक आहे. तथापि, हे केवळ नवीन आॅटोडोर बंद करण्याच्या ईएमयू गाड्यांमध्ये दिसून येते.
रेल्वे डब्याच्या शेवटी तुम्ही पिवळे, निळे, लाल पट्टे पाहिले असतीलच, परंतु आपल्याला त्याबद्दल माहिती आहे?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 5, 2020 16:13 IST
भारतीय रेल्वेमध्ये प्रवास करत असताना अनेक वेळा डब्यावरील निळ्या-पिवळ्या आडव्या रेषेचा अर्थ काय होतो याची अनेकांना माहिती नसते.
रेल्वे डब्याच्या शेवटी तुम्ही पिवळे, निळे, लाल पट्टे पाहिले असतीलच, परंतु आपल्याला त्याबद्दल माहिती आहे?
ठळक मुद्देनिळ्या कोचवर पिवळे-पांढरे पट्टे म्हणजे तो जनरल डबा होयनिळ्या कोचवर जाड पिवळे पट्टे असतील तर तो अपंग आणि आजारी प्रवाशांसाठीचा डबा होयतपकिरी रंगाचे पट्टे प्रथम वर्ग असल्याचे दर्शवितात