शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
5
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
6
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
7
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
8
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
9
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
10
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
11
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
12
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
13
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
14
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
15
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
16
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
17
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
18
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
19
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
20
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
Daily Top 2Weekly Top 5

अशी वाहतुकीची शिस्त आपण पाळा...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 6, 2019 13:25 IST

सध्या केलिफोर्निया येथील फ्रिमोंट येथे आहे.सॅनफ्रान्सिस्को विमान तळापासून जवळ जवळ ४५ मैल फ्रिमोंट म्हणून गाव आहे. प्रचंड वाहतूक,४५ मैल ...

सध्या केलिफोर्निया येथील फ्रिमोंट येथे आहे.सॅनफ्रान्सिस्को विमान तळापासून जवळ जवळ ४५ मैल फ्रिमोंट म्हणून गाव आहे. प्रचंड वाहतूक,४५ मैल येताना किती तरी चौक,किती तरी सिग्नल व्यवस्था कार्यरत होती. परंतु एक पण वाहतूक पोलीस दिसला नाही. सगळे लोकं समजूतदार,वाहतुकीच्या नियमांचे तंतोतंत पालन,आणि डोकं शांत ठेवणारे वाहनमालक. दोन वाहनांमध्ये कमीत कमी ५० फूट अंतर ठेवण्याची इथे पद्धत आहे.रस्ता ओलांडताना माणूस दिसला की चालक ४० ते ५० फूट गाडी उभी करतो.रस्ता क्रॉस करताना फुटपाथ वर खांबावर लाल लाईट चे बटन आहे, ते आपण दाबले की संपूर्ण ट्रॅफिक थांबतो. इथे पायी चालणाऱ्यांना वाहनचालक आणि मालक सन्मान देतात. आपल्या कडे सुद्धा लोकांनी समजूतदारपणा दाखवला आणि वाहतुकीच्या नियमांचे तंतोतंत पालन केले तर आपल्याकडे सुद्धा वाहतूक कर्मचाऱ्यांवरील भार कमी होईल. पोलीस फक्त विमानतळावर दिसले बाकी अजून चौकात, हायवेवर,मार्केट किंवा मॉल मध्ये कुठेच दिसले नाही. कुठेतरी लहान मोठा अपघात झाल्यावर काही मिनिटात पोलीस येतात.सगळी कडे कॅमेरे आणि उपग्रहाच्या माध्यमातून नजर ठेवली जाते. ४५मैलाच्या रस्त्यात खूप गावे लागतात पण पोलिस कुठेच दिसले नाही आणि आपल्या जळगाव शहरात जवळ जवळ १०० कर्मचारी आहेत. लोकांना शिस्त लावणे ही खूप महत्त्वाची बाब आहे.वाहतुकीचा नियम मोडल्यास जब्बर दंड आकरावा.त्या शिवाय शिस्त लागणार नाही. गाड्यांचा वेग गावात ताशी १00 असतो पण एमबुलन्स चा सायरन वाजला की तसा ट्रॅफिक थांबते आणि एम्ब्युलन्सला वाट करून देतात- जतिन ओझा

टॅग्स :Jalgaonजळगाव