शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
4
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
5
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
6
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
7
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
8
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
9
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
10
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
11
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
12
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
13
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
14
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
15
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
16
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
17
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
18
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
19
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
20
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
Daily Top 2Weekly Top 5

योग व निसर्गोपचारानेच आजारापासून मुक्ती - योग व निसर्गोपचार तज्ज्ञ डॉ. विश्वास मंडलीक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 27, 2018 12:49 IST

औषधांनी केवळ आजारावर नियंत्रण मिळविता येते

ठळक मुद्देनिसर्गोपचाराचा प्रसारनिसर्गोपचार पद्धतीचे फायदे

विजयकुमार सैतवाल / ऑनलाईन लोकमत

जळगाव, दि. 27-  औषधी घेऊन कोणत्याही आजारावर केवळ नियंत्रण मिळविता येते, यातून आजार बरा होत नाही. मात्र योग व निसर्गोपचाराने आजार  पूर्णपणे बरा होऊन त्यापासून मुक्ती मिळते, असा विश्वास योग विद्या गुरुकुलचे (नाशिक) कुलगुरु तथा योग व निसर्गोपचार तज्ज्ञ डॉ. विश्वास मंडलीक यांनी व्यक्त केला. मू.जे. महाविद्यालयातील सोहम् डिपार्टमेंट ऑफ योग अॅण्ड नॅचरोपॅथीच्या वतीने 23 रोजी ‘निसर्गधारा’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यासाठी ते शहरात आले होते, त्या वेळी त्यांच्याशी ‘लोकमत’ने संवाद साधला. तो असा..

प्रश्न - औषध विरहीत उपचार पद्धती नेमकी कशी असते?डॉ. मंडलिक- प्रत्येकाच्या शरीरात आजार बरा करण्याची निसर्गाने दिलेली क्षमता असते.  रुग्णाची हीच शारिरीक क्षमता औषध विरहीत उपचार पद्धतीने वाढविली जाते.  पंचमहाभुतांद्वारे मानवी शरीर तयार झाल्याने यात पंचमहाभौतिक उपचार पद्धतीने उपचार केले जातात.   

प्रश्न : निसर्गोपचार पद्धतीचे काय फायदे आहेत ?डॉ. मंडलिक- निसर्गोपचार पद्धती ही सर्वच पॅथींपेक्षा सरस आहे. गोळ्य़ा-औषधीवर मोठय़ा प्रमाणात  खर्च करुनही आजार पूर्णपणे बरा होत नाही तर  त्यावर नियंत्रण मिळविता येते. मात्र  निसर्गोपचार पद्धती  पूर्णपणे मोफत असून त्यामुळे आजार पूर्णपणे बरा होतो.  

प्रश्न : धकाधकीच्या जीवनात योगासाठी वेळ नसल्याची अनेकांची तक्रार असते, याबाबत काय सांगाल?डॉ. मंडलिक- हो हे खरे आहे.  मात्र, एकदा जर शरीराला योगाची सवय झाली तर दिवसभर उत्साह राहतो. त्यामुळे कामेदेखील कमी वेळात होतात व वेळ  शिल्लक राहिल्याने त्या वेळेचा योगासाठी उपयोग करता येऊ शकतो. 

प्रश्न : निसर्गोपचाराचा प्रसार होत आहे का?डॉ. मंडलिक- निसर्गोपचाराचा प्रसार वेगाने होत असून केंद्र आणि राज्य सरकारदेखील यासाठी प्रय}शील आहे. सरकारकडून आता योग आणि निसर्गोपचार परिषद स्थापनेच्या हालचाली सुरू आहेत. विद्यापीठ अनुदान आयोगानेदेखील आता सर्वच विद्यापीठांमध्ये निसर्गोपचार अभ्यासक्रम सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. हा अभ्यासक्रम सुरू करणारे उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ हे राज्यातील पहिले विद्यापीठ ठरले असून सोहम् डिपार्टमेंट ऑफ योग अॅण्ड नॅचरोपॅथी केंद्रात निसर्गोपचार अभ्यासक्रम शिकवला जातो. तेदेखील पहिलेच केंद्र ठरले आहे.पतीला साथ देणे हेच ‘करिअर’ समजा - पौर्णिमा मंडलीकडॉ. विश्वास मंडलीक यांच्या योग प्रसाराच्या कार्यात त्यांना पत्नी पौर्णिमा मंडलीक याही साथ देत आहेत.