शहरं
Join us  
Trending Stories
1
‘सत्याचा मोर्चा’वरून आयोजकांवर गुन्हा दाखल; मनसेची पहिली प्रतिक्रिया आली, भाजपावर टीका
2
Raj Thackeray : "धर्माच्या नावावर लोकांना आंधळं केलं की..."; राज ठाकरेंची खास पोस्ट, रंगली जोरदार चर्चा
3
तुमच्या जुन्या बँक खात्यात पैसे विसरलात का? RBI ने सांगितला फक्त ३ स्टेप्सचा सोपा मार्ग
4
"लोकसंख्या धोरण लवकरात लवकर लागू करणे आवश्यक, तरच..."; RSS ची सरकारकडे मागणी, होसबळे म्हणाले...
5
नात्याला काळीमा ! दीराने वहिनीचे दोन्ही हात पकडून ठेवले अन् पतीने कापला गळा...
6
AUS vs IND 3rd T20I : संजू संघातून ‘आउट’; टॉसवेळी सूर्याचं मिचेल मार्शसमोर भन्नाट सेलिब्रेशन!
7
उद्धव ठाकरेंचा मराठवाड्यात ४ दिवस "दगाबाज रे" संवाद दौरा, शेतकऱ्यांशी साधणार संवाद
8
'ट्रॅजेडी क्वीन' मीना कुमारीवर बायोपिक येणार, क्रिती सेननचा पत्ता कट; 'ही' अभिनेत्री फायनल?
9
भाग्यवान! ११ वर्षांच्या मुलाचं अचानक 'असं' फळफळलं नशीब, रातोरात झाला करोडपती
10
डोक्यात रॉड मारून मोठ्या भावाची हत्या, मग गर्भवती वहिनीवर बलात्कार, नंतर तिलाही संपवलं...
11
अग्नितांडव! मेक्सिकोच्या सुपरमार्केटमध्ये भीषण आग; लहान मुलांसह २३ जणांचा मृत्यू
12
५,८०० कोटींच्या २००० रुपयांच्या नोटा अजूनही लोकांकडे पडून! अजूनही बदलण्याची संधी
13
सोमवारी प्रदोष व्रत २०२५: महादेव पूजनासह ‘या’ ७ गोष्टी आवर्जून करा; काही कमी पडणार नाही!
14
तिरुपतीच्या धर्तीवर पंढरपुरात होणार दर्शन मंडप; वारकऱ्यांना मिळणार कमी वेळेत विठ्ठलाचे दर्शन
15
सोमवारी प्रदोष व्रत २०२५: केवळ लाभ होईल, नशीब साथ देईल; प्रभावी शिव मंत्रांचा नक्की जप करा!
16
King Title Reveal: वाढदिवशी शाहरुखचं चाहत्यांना सरप्राईज! 'किंग'चा पहिला प्रोमो रिलीज, व्हिडीओ बघाच
17
Manoj Tiwari : "शिवीगाळ केली, वाहनांवर हल्ला"; मनोज तिवारींच्या रोड शोमध्ये प्रचंड गोंधळ, RJD वर गंभीर आरोप
18
"ख्रिश्चनांचं हत्याकांड थांबवलं गेलं नाही तर...!"; डोनाल्ड ट्रम्प यांची आता ‘या’ देशाला थेट हल्ल्याची धमकी
19
"लेकाच्या कठीण प्रसंगी देश विरोधात असताना...", शाहरुखबद्दल हिमानी शिवपुरी काय म्हणाल्या?
20
९ वर्षांच्या मुलीने मारली चौथ्या मजल्यावरून उडी, शाळेने पुरावे केले नष्ट; धक्कादायक Video

होय, आम्ही एचआयव्हीसोबत जगत आहोत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2020 00:53 IST

स्वत:ला एचआयव्हीची लागण झाली हे कळल्यावरसुद्धा त्यांनी स्वत:ला सावरून जगण्याची उमेद निर्माण केली

ठळक मुद्देमहिला दिन विशेषएचआयव्हीग्रस्त महिलांची प्रेरणादायी कथा इतरांना मार्गदर्शक

संजय पाटील ।अमळनेर, जि.जळगाव : एचआयव्हीची लागण झाली म्हणजे मृत्यू जवळ आला, असे समजून अनेकांची पाचावर धारण बसते. मात्र एड्सने पतीचा मृत्यू झाला, स्वत:ला एचआयव्हीची लागण झाली हे कळल्यावरसुद्धा त्यांनी स्वत:ला सावरून जगण्याची उमेद निर्माण केली म्हणून त्या दोघी धाडसाने म्हणतात, ‘होय, आम्ही एचआयव्हीसोबत जगत आहोत.’ मृत्यूच्या दारात गेलेल्या दोघं इतरांसाठी मात्र प्रेरणादायी ठरल्या आहेत. स्वत:च्या जीवनाला नवी दिशा देऊन इतरांना दिशा देत आहेत.४० वर्षीय साधना बडगुजर आपली कथा सांगताना म्हणतात, ‘विवाहानंतर एक वर्षात मुलगी झाली आणि पुढच्याच वर्षी डॉक्टर असलेले पती आजारी पडले. सर्व तपासण्या केल्या अन् अचानक आलेल्या वावटळीत माझी फुलबाग उद्ध्वस्त झाली. आरसा तडकावा तशी मनाची काच कचकन फुटली.’पतीला एचआयव्ही झाल्याचे कळले आणि एक वर्षात त्यांचा मृत्यू झाला. नंतर साधना यांचीही तपासणी केली. त्यांनाही एचआयव्हीची लागण झालेली होती. अवघे बारावीपर्यंत शिक्षण होते. सासऱ्यांनी सहकार्य केल्याने पदवीपर्यंत शिक्षण घेतले. शिवण काम सुरू केले. जिद्दीने शेती काम शिकल्या. डोळ्यासमोर लहान मुलगी दिसत होती. मुलगी १८ महिन्यांची होताच तिची तपासणी करण्यात आली. मात्र तिला एचआयव्हीची लागण नव्हती, हे कळताच आंनद झाला. तिच्यासाठी जगण्याची नवी उमेद निर्माण झाली.आधार संस्थेकडून मिळाला ‘आधार’एआरटी सेंटरमध्ये जाऊन औषधी घेतली आणि आधार संस्थेच्या अध्यक्ष भारती पाटील यांच्याकडून आधार मिळाला. पालकांपासून बालकांना होणाºया एचआयव्हीपासून बचाव कसा करायचा यावर गरोदर महिलांना मार्गदर्शन करण्याचे पियर एज्युकेटर काम मिळाले. जीवन कसे जगायचे, संघर्ष कसा करायचा यासाठी प्रेरणा मिळाली. त्या इतरांनाही मार्गदर्शन करू लागल्या. मुलीला आयटीआय केले. तिला नोकरीला लावले. तिचे लग्न केले. आता सारे कुटुंब आनंदात आहे. अजून जगायला आवडेल हे सांगताना साधना म्हणाल्या, आज आमच्या अश्रूमध्ये तेज आहे, पुढे जगण्याची आमच्यात आता उमेद आहे.’एडस्ग्रस्त पतीने केली आत्महत्यादुसरी तेजस्विनी (वय ४०) (नाव बदलले आहे) म्हणते की, आई वडिलांनी २० वर्षांपूर्वी मोठ्या गावाचे सधन शेतकरी म्हणून लग्न लावले. दोन मुले झाली. त्यात एक दिव्यांग आणि अचानक सहा वर्षात पतीला एचआयव्ही असल्याचे कळले. आजाराला कंटाळून पतीने आत्महत्या केली. स्वत:ची तपासणी केली. तेव्हा कळले की, आपल्यालादेखील एचआयव्हीची लागण झाली आहे. मरण जवळ दिसत होते. पती गेल्यानन्तर सहकार्य मिळत नाही. मुलांची चाचणी केली. पण त्यांना काहीच निघाले नाही म्हणून त्या मुलांसाठी निर्धाराने जगण्याचा निर्णय घेतला. आधार संस्थेच्या भारती पाटील यांनी बाह्य संपर्क कार्यकर्ता म्हणून पगारावर नोकरी दिली. त्यातून घरभाडे, मुलांचा दवाखाना, शिक्षण आदी खर्च भागवला जातो. हे करत असताना पतीची वारस म्हणून मालमत्ता मिळण्यासाठीही संघर्ष करावा लागत आहे. एकदा एका गाठीची शस्त्रक्रिया करायची होती. पण एचआयव्ही असल्याचे कळताच किमान १० डॉक्टरांनी नकार दिला. मात्र एक डॉक्टरने भारती पाटील यांच्या सहकार्याने शस्रक्रिया केली. आजारामुळे थकवा जाणवतो. मात्र ज्याच्यामुळे आपले आयुष्य उद्ध्वस्त झाले त्या आजारामुळे इतरांचे आयुष्य उद्ध्वस्त होऊ नये म्हणून अशा महिलांना प्रेरणा, मार्गदर्शन केल्याने स्वत:च्या आजाराचा दोघांना विसर पडला आहे. सर्वसामान्य महिलांप्रमाणे त्या एचआयव्ही आजाराला घेऊन जगत असताना इतरांसाठी मात्र प्रेरणादायी ठरल्या आहेत.

टॅग्स :Women's Day Specialजागतिक महिला दिनAmalnerअमळनेर