शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
3
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
4
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
5
बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
6
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
7
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
8
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
9
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
10
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
11
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
12
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
13
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
14
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
15
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
16
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
17
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
18
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
19
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
20
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
Daily Top 2Weekly Top 5

यंदा ई- मतपत्रिकांद्वारे सर्व्हीस व्होटर करणार मतदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2019 13:20 IST

इलेक्ट्रॉनिकली ट्रान्समिटेड पोस्टल बॅलेट सिस्टीमचा वापर

जळगाव : लोकसभा निवडणुकीत सैन्य अधिकारी, कर्मचाऱ्यांना यंदा टपाली मतदानाऐवजी आॅनलाईनपद्धतीने मतपत्रिका पाठविण्यात येऊन मतदान होणार असून जळगाव जिल्ह्यात ही प्रक्रिया सुरू झाली आहे. इलेक्ट्रॉनिकली ट्रान्समिटेड पोस्टल बॅलेट सिस्टीमनुसार (ईटीपीबीएस) होणाºया या मतदान पद्धतीसाठी सात हजार ९९२ मतदार असून त्यांना आॅनलाईन मतपत्रिका पाठविण्यात आल्या आहेत.नोकरीनिमित्त अथवा निवडणुकीच्या कामासाठी बाहेर गावी असलेल्या कर्मचाऱ्यांना मतदान करता यावे यासाठी टपाली मतदान पद्धतीने मतदान मागविले जाते.यंदा सैन्यातील अधिकारी, कर्मचारी (सर्व्हीस व्होटर) यांच्यासाठी नवीन प्रणाली कार्यान्वित केली असून जळगाव जिल्ह्यात जळगाव व रावेर दोन्ही मतदार संघातील या मतदारांना आॅनलाईन पद्धतीने मतपत्रिका पाठविण्यात आल्या आहेत.मतदान कर्मचाºयांसाठी टपाली मतदानाची सोयमतदानाच्या दिवशी अनेक कर्मचारी निवडणुकीच्या कामासाठी बाहेर गावी असतात. त्यामुळे त्यांना पूर्वीप्रमाणेच टपाली मतदानाची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे.ते मतदानाच्या दिवशी मतदान करुन टपालाद्वारे मतपत्रिका पाठवू शकतात अथवा प्रशिक्षणादरम्यानही मतदान करु शकतात, अशी सोय जिल्हा निवडणूक शाखेच्यावतीने करण्यात आली आहे.काय आहे ईटीपीबीएस प्रणालीपूर्वी सैन्यातील अधिकारी, कर्मचाºयांना मतदानासाठी टपालाने मतपत्रिका पाठवून टपालाद्वारेच मागविली जात असे. मात्र आता इलेक्ट्रॉनिकली ट्रान्समिटेड पोस्टल बॅलेट सिस्टीमनुसार (ईटीपीबीएस) या मतदारांचे मतदान करुन घेतले जात आहे. यात आता संबंधित मतदारांच्या मतपत्रिका ई-मेलद्वारे अधिकारी, कर्मचारी कार्यरत असलेल्या ठिकाणी पाठविल्या जातात. त्या ठिकाणी मतदार या मतपत्रिका डाऊनलोड करून त्यावर मत देऊन त्या पत्रिका टपालाद्वारे परत पाठवितात.बारकोडद्वारे खात्रीआॅनलाईनपद्धतीने पाठविलेल्या मतपत्रिकेद्वारे मतदान करण्यासाठी बारकोडचा वापर केला जातो. जेणेकरुन संबंधित मतदाराद्वारेच हे मतदान झाले पाहिजे व मतमोजणीवेळी त्याची खात्री केली जाते.मतपत्रिका रवानाजळगाव लोकसभा मतदार संघात ६ हजार ८४० सर्व्हीस व्होटर असून रावेर लोकसभा मतदार संघात १ हजार ९४४ असे मतदार आहेत. दोन्ही मतदार संघातील या एकूण ७ हजार ९९२ सर्व्हीस व्होटर्सना आॅनलाईन पद्धतीने मतपत्रिका पाठविण्यात आल्या आहेत. त्या परत येण्याची प्रक्रियादेखील सुरू झाली असल्याची माहिती जिल्हा निवडणूक विभागाच्यावतीने देण्यात आली.

टॅग्स :Jalgaonजळगाव